युवा समितीतर्फे हलशी परिसरात शैक्षणिक साहित्याचे वितरण खानापूर : सीमा भागात मराठी शाळा टिकविण्यासाठी पालकांनी जबाबदारी घेणे गरजेचे असून मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या शाळेत विद्यार्थी कशा प्रकारे वाढतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका …
Read More »शिवाजी महाराज उद्यानातील स्क्रॅप विमान हटविण्यासाठी निवेदन
निपाणी (वार्ता) : शहरातील दक्षिण प्रवेशद्वार समोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमधील स्क्रॅप विमान तात्काळ हटवावे. त्यामधे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करून नागरिकांसाठी उद्यान खुले करावे, अशा आशयाचे निवेदन बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना चिक्कोडी काँग्रेस कमिटी व निपाणी ब्लॉक कमिटीतर्फे देण्यात आले यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, …
Read More »चन्नेवाडी शाळा सुधारणा समिती अध्यक्षपदी शंकर पाटील
खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथील शाळा गेली अनेक वर्षांपासून बंद होती पण गावकरी व पालकांनी केलेल्या प्रयत्नांनी तसेच पाठपुराव्याने यावर्षी म्हणजेच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून सुरुवात करण्यात आली. शाळेची नवीन शाळा सुधारणा कमिटी नेमण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी शंकर पाटील तर उपाध्यक्षपदी रेणुका दत्ताराम पाटील यांची एकमताने निवड करण्यात …
Read More »सीमाभागातील प्रेक्षकांनी ‘गाभ’ चित्रपट पाहावा यासाठी मराठी हॉटेल व्यावसायिकाचा अनोखा उपक्रम
निपाणी (वार्ता) : ग्रामीण संस्कृतीचा बाज असलेला ‘गाभ’ मराठी चित्रपट २१ जून रोजी प्रदर्शित झाला. वेगळे कथानक असल्यामुळे मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. बेळगाव सीमा भागातील जत्राट येथे लक्ष्मण पाटील या तरुणाने कर्नाटकात मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रसार व्हावा, यासाठी या चित्रपटाचे तिकीट घेऊन आपल्या हॉटेलमध्ये …
Read More »विद्यार्थ्यांनी निभावला मतदानाचा हक्क!
खानापूर : पहिल्यांदा मतदान करण्याची उत्सुकता सर्वांमध्येच असते. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी युवा वर्ग धडपड करीत असतो. मात्र शिक्षण खात्याने मतदार साक्षरता संघामार्फत शालेय मंत्रिमंडळ निवड प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते याचे धडे मिळत असून मंगळवारी हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल येथे …
Read More »उत्तर कार्याला फाटा देऊन खराडे कुटुंबीयांकडून रोपांचे वाटप
निपाणी (वार्ता) : येथील शिक्षण सेवा मंडळ संचलित विद्यामंदिर शाळेचे गणित शिक्षक आप्पासाहेब खराडे यांचे नुकतेच निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी उत्तर कार्याच्या कार्यक्रमाला फाटा देऊन रोपांचे वाटप करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अमित खराडे आणि कुटुंबीयांनी तिसऱ्या दिवशी नातेवाईकांना १२५ रोपांचे वाटप करून पर्यावरण पूरक उत्तरकार्य पूर्ण केले. आप्पासाहेब …
Read More »दुधाचे दर वाढवलेले नाहीत; मुख्यमंत्री सिद्धरामय्या
अतिरिक्त दूधासाठी अतिरिक्त किंमत बंगळूर : दुधाचे उत्पादन वाढल्याने नंदिनी दुधाचे प्रति पॅकेट ५० मि.ली. दुधाचे प्रमाण वाढले आहे. यावर स्पष्टीकरण देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जादा दुधासाठी दोन रुपये दर ठरवून तो ग्राहकांकडून वसूल केला आहे, मात्र दुधाच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे. …
Read More »नंदिनी दूधाच्या दरात दोन रुपयाने वाढ
प्रति लिटर ५० मिली अतिरिक्त दूध मिळणार बंगळूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आता दुधाच्या दरातही वाढ झाली आहे. कर्नाटक दूध महामंडळाने दुध दरात बदल केला असून दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उद्या (ता. २६) पासून ही दरवाढ लागू होणार आहे. नंदिनी दुधाच्या …
Read More »बालविवाहाच्या आरोपावरून पतीला अटक
खानापूर : अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याच्या आरोपावरून बालविकास योजना अधिकाऱ्यांनी तिच्या पतीला अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले असल्याची घटना मंगळवारी खानापूर तालुक्यातील हिरेमुन्नळ्ळी येथे घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हिरेमुन्नळ्ळी गावातील २४ वर्षीय तरुण हा मंजुनाथ डुगनावर याने …
Read More »कर्नाटकाचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील कन्नड शाळांना भेट देणार
बेंगळुरू : कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरणाचे शिष्टमंडळ सांगली जिल्ह्यातील जत आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या तालुक्यांतील कन्नड कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राच्या सीमावर्ती तालुक्यांतील आमदारांना भेटणार आहे. महाराष्ट्र सरकारने ११ कन्नड शाळांमध्ये १५ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता. ज्या विद्यार्थ्यांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta