Tuesday , May 28 2024
Breaking News

कर्नाटक

जनतेला आर्थिक शक्ती देणे हाही एक विकासच : सिध्दरामय्या

  पुण्यतिथीनिमित्त पं. नेहरूना अभिवादन, मोदींवर हल्लाबोल बंगळूर : लोकांना सामाजिक आणि आर्थिक शक्ती देणे हा देखील विकास आहे. केवळ रस्ते, पूल आणि सिंचन बांधणे म्हणजे विकास नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. केपीसीसी कार्यालयात देशाचे माजी पंतप्रधान डॉ. पंडित जवाहरलाल …

Read More »

हडलगा येथे बसची सोय करा; विद्यार्थी, समितीची मागणी

  खानापूर : हडलगा येथे बस फेरी सुरू करावी याचे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून खानापूर डेपो मॅनेजरना आज निवेदन देण्यात आले. हडलगा ता. खानापूर येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी काल एक व्हिडिओ प्रसारित करून सरकारी बसची मागणी केली होती, याची दखल खानापूर म. ए. समिती व युवा समिती खानापूर यांनी घेत …

Read More »

प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी एसआयटी चौकशीसाठी राहणार हजर

  बंगळुरू : प्रज्वल रेवण्णा एका महिन्यानंतर दिसला आहे. परदेशात लपून बसलेल्या प्रज्वलने एक व्हिडिओ जारी केला असून तो ३१ मे रोजी एसआयटी तपासासाठी येणार असल्याचे सांगितले आहे. देशभरात प्रचंड चर्चेचा विषय असलेले हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा महिनाभरानंतर हजर झाले आहेत. २६ एप्रिल रोजी मतदान करून परदेशात गेलेले खासदार प्रज्वल …

Read More »

स्वतःची अधुरी प्रेमकहाणी सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून तरुणांना आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन

  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं. सिद्धरामय्या म्हणाले, “मी महाविद्यालयात शिकत होतो तेव्हा माझं एका मुलीवर प्रेम होतं. मी मोठ्या हिंमतीने त्या मुलीसमोर माझ्या प्रेमाची कबुली दिली आणि तिला लग्नासाठी विचारलं. मात्र आमची जात वेगवेगळी असल्यामुळे ते नातं पुढे जाऊ शकलं नाही.” कर्नाटकचे …

Read More »

उडपीत दोन गटात धुमश्चक्री: कारने तरुणाला चिरडले

  उडपी : कर्नाटकच्या उडपी भागातील कुंजीबेट्टू परिसरात कापू भागातील तरुणांच्या दोन टोळक्यांमधील वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. उडपी-मणिपाल राष्ट्रीय महामार्गावरील या घटनेचा व्हिडीओ एका इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने शूट केला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. तसेच, गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या तलवारी, …

Read More »

बेकवाड येथील व्यक्तीने केला पत्नीचा खून! वास्को गोवा येथील घटना

  खानापूर : बेकवाड (ता. खानापूर) येथील पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करून खून केल्याची घटना वास्को-गोवा येथे शुक्रवारी दुपारी घडली. वैशाली चाळोबा केसरेकर (वय 39) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती चाळोबा गुणाजी केसरेकर (वय 45) याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, …

Read More »

प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल : 50 पीडिता, 12 जणींवर बलात्कार; दाखल गुन्हे तीन

  बंगळूर : सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी तसेच हासनचा जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा याच्यासोबत व्हिडीओत दिसणार्‍या 50 जणींशी संपर्क साधण्यात यंत्रणांना यश आले आहे. यापैकी 12 जणींवर बळजबरी झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून, प्रत्यक्षात प्रज्वल याच्याविरोधात अद्याप केवळ 3 ठोस गुन्हे दाखल झालेले आहेत. लैंगिक छळ झालेल्या पीडितांमध्ये 22 ते …

Read More »

वादळी वारे, पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना ‘अरिहंत’तर्फे भरपाईचे धनादेश

  निपाणी (वार्ता) : वादळी वारे आणि पावसामुळे शहरांसह परिसरातील अनेक घरासह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून तात्काळ मदत म्हणून अरिहंत उद्योग समूह, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातर्फे सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (ता.२४) १९ जणांना मदतीचे धनादेश देण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. …

Read More »

चिक्कोडी परिसरात विज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

  चिक्कोडी : चिक्कोडी परिसरात गुरुवारी रात्री विज कोसळून दोन शेतकरी व 12 मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत. हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळ गावात वीज पडून गुरु पुंडलिक (३५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले. जखमींवर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संकेश्वर शहराच्या हद्दीत वीज पडून 12 मेंढ्यांचा …

Read More »

झुंजवाड (के एन) येथे विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने एकाचा जागीच मृत्यू

    खानापूर : खानापूर तालुक्यातील झुंजवाड (के एन) येथे पत्र्याच्या शेडला विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने निवाऱ्याखाली थांबलेल्या एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पावलेल्या युवकाचे नाव मोहन (दीपक) नारायण पाटील (वय 38) रा. झुंजवाड के. एन. असे आहे. याबाबत मिळालेली माहिती की, झुंजवाड के एन येथे श्री. …

Read More »