Monday , May 25 2026
Breaking News

कर्नाटक

मणतुर्गा येथे दुकान फोडून चोरी; २० हजाराचा मुद्देमाल लंपास

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा–हेमाडगा रस्त्यालगत असलेल्या एका पान टपरी दुकानात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे १५ ते २० हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम भरमानी देवलतकर यांनी उपजीविकेसाठी रस्त्यालगत छोटासा दुकानाचा खोका उभारला होता. …

Read More »

साखर चोरी प्रकरणी उच्च न्यायालयाचे हालसिध्दनाथ कारखान्याच्या चौकशीचे आदेश

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्यातील साखर चोरीबद्दल येथील न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला होता. याप्रकरणी विद्यमान अध्यक्ष, संचालक मंडळ व अधिकारी वर्गाच्या विरोधात निपाणी न्यायालयात एफ् आय आर दाखल करण्यात आला आहे. या चोरीतील ५०८४ साखर पोती अबकारी अधिकाऱ्यांनी पकडली होती. कारखान्याकडून ९९ लाख रुपयांचा दंड …

Read More »

सततच्या विजेच्या खेळखंडोब्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित

  निपाणी (वार्ता) : वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व मुख्य जलवाहिन्या अनेक भागात फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागासह उपनगरातील पाणी पुरवठावर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावा धाव करावे लागत असून पाण्याचे टँकर मागावे लागत आहेत. परिणामी सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक फटका बसत असल्याने नाराजी …

Read More »

महात्मा गांधी रुग्णालयाजवळील भुयारीमार्ग खुला केल्याने वाहतूक सुरळीत

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील महात्मा गांधी रुग्णालयाजवळील नवीन भुयारी मार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या भुयारी मार्गामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात आली असून वाहनचालक आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महामार्गावरील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे या परिसरात सातत्याने वाहतूक …

Read More »

निपाणीतील पर्यावरण प्रेमी शिक्षकाने दिला उत्तरकार्याला पर्यावरण संवर्धनाची दिशा

  निपाणी (वार्ता) : म्हाकवे येथील अनुसया भाऊ पाटील यांच्या उत्तरकार्याच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम पार पडला. निपाणीतील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी धार्मिक विधींना पर्यावरणपूरक दिशा देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे आयोजित रोप लागवड केलेल्या आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. …

Read More »

खतांच्या दरवाढीने शेतकरी संकटात

  खरीप हंगामापूर्वीच दर गगनाला; उत्पादन खर्च वाढणार निपाणी (वार्ता) : खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षी सुमारे १३५० रुपयांना मिळणारी खताची बॅग आता २१०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादन खर्चावर होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी शेती …

Read More »

परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा इशारा

  “काम नाही तर वेतन नाही”;शिस्तभंग कारवाईचा इशारा बंगळूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या २० मेपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार आणि परिवहन महामंडळ प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. “काम नाही तर वेतन नाही” या तत्त्वानुसार संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात …

Read More »

फायटर्सने कोरले ‘अरिहंत’ चषकावर नाव

  राजमनी ट्रॅव्हल्स उपयोजिता; व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री बालवीर स्पोर्ट्स क्लबच्यावतीने आयोजित ‘अरिहंत चषक’ व्हॉलीबॉल लीग स्पर्धेच्या अंतिम सामना राजमनी ट्रॅव्हल्स व नितीन शिंदे फायटर्स या दोन संघांमध्ये झाला. यावेळी झालेल्या सामन्यात ३ विरुद्ध १ सेटने नितीन फायटर्स संघाने विजय संपादन करून अरिहंत चषकावर …

Read More »

अरिहंत साखर कारखान्यास अत्युत्तम तांत्रिक साखर कारखाना पुरस्कार प्रदान

  निपाणी (वार्ता) : जैनापूर येथील अरिहंत साखर कारखान्याने आपल्या उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीच्या जोरावर ‘अत्युत्तम तांत्रिक साखर कारखाना’ हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. राज्याच्या साखर उद्योगात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बेळगाव येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे साखर मंत्री शिवानंद पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. खाजगी साखर कारखान्यातील पुरस्कारासाठी अरिहंत …

Read More »

बेंगळुरू- बेळगाव- मुंबई नव्या रेल्वेगाडीला रेल्वेमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

  बेळगाव : बेंगळुरू ते मुंबईदरम्यान सुरू करण्यात आलेल्या नव्या रेल्वेसेवेला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी व्हर्च्युअल पद्धतीने हिरवा झेंडा दाखविला. या नव्या रेल्वेमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी सोय होणार असून बेळगावमार्गे धावणाऱ्या या गाडीमुळे दोन्ही राज्यांतील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी दक्षिण …

Read More »