Sunday , July 26 2026
Breaking News

साखर चोरी प्रकरणी उच्च न्यायालयाचे हालसिध्दनाथ कारखान्याच्या चौकशीचे आदेश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्यातील साखर चोरीबद्दल येथील न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला होता. याप्रकरणी विद्यमान अध्यक्ष, संचालक मंडळ व अधिकारी वर्गाच्या विरोधात निपाणी न्यायालयात एफ् आय आर दाखल करण्यात आला आहे. या चोरीतील ५०८४ साखर पोती अबकारी अधिकाऱ्यांनी पकडली होती. कारखान्याकडून ९९ लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. या चौकशी विरोधात कारखान्याचे संचालक व अधिकाऱ्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात अपिल दाखल करून पुढील चौकशी रद्द करण्याचा दावा दाखल केला होता. कोर्टाने याबाबत संपूर्ण सुनावणी करून संचालक व अधिकाऱ्यांची अपील फेटाळून लावली आहे. आपल्या ३१ पानी सविस्तर निकालपत्रात कोर्टाने संचालकांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला आहे.
पुराव्यांच्या आधारावर खटला दाखल केला जातो, त्यावेळी सखोल चौकशीची गरज असते. निपाणी न्यायालयाला सुनावणी पूर्ण करून योग्य तो निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाने सांगितले आहे. या आदेशामुळे कारखानाच्या नेतेमंडळीचे अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडल्याची माहिती माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी दिली.यावेळी संजय वाघ, दत्ता लाटकर, मुरघेंद्र कल्याणशेट्टी उपस्थित होते. चोरून नेलेली साखरपोती कशी सापडली याबाबत नेते मंडळी, संचालक मंडळ, अधिकारी व कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक का एकवाक्यता नाही.
माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी पत्रकार बैठक घेऊन कारखान्याच्या चुकीसह हमाल संख्या कमी झाल्याने उत्पादित केलेली साखर गोडावूनमध्ये व्यवस्थित ठेवता आली नाही. त्याचे अकाऊंट ठेवता आले नाही. म्हणून कारखान्यावर एप्रिलमध्ये जी.एस.टी.चा छापा पडाला होता. त्यामुळे रितसर जीएसटी रक्कम दंडासह ९७ लाख ७९ हजार ९४० रुपये जमा केल्याचे सांगितले होते. पोत्यांचा फरक हा हमालानी केला की मोजायला चुकल्यामुळे हे आण्णासाहेब जोल्ले यानी आता जाहीर करावे. एवढा मोठा फरक असताना सरकारला प्रत्येक गोडाऊनचे खोटे आकडे दाखवून सरकारला फसवले आहे.
शुगर कंट्रोल ऑर्डर १९६६ च्या कायद्याचे तीन तेरा वाजवले आहेत.उच्च न्यायालयाला हा मोठा फरक स्पष्ट दिसल्यामुळेच याचिका फेटाळून लावली आहे. २०१८ मध्ये आम्ही कारखाना वाचवला म्हणून सांगणारे जोल्ले यांनी कारखाना वाचवला की स्वतःच्या फायद्यासाठी कर्जाच्या खाईत घातला हे तपासून पहावे. ३१ मार्च २०१८ रोजी कारखान्याचे कर्ज व ठेवी ३०० कोटीचे होते. तेच ३१ मार्च २०२६ रोजी ११५० कोटीहून जास्त आहे. या कर्जात व ठेवीत बिरेश्वर व ज्योती चा वाटा ७२५ कोटीहून अधिक असून व्याज दर १३.५० टक्के आहे. म्हणजे कारखान्याकडून यांना ८० कोटीहून जास्त व्याज मिळते. म्हणूनच बिरेश्वरला ५१ कोटीचा नफा झाला हे सांगायला पुराव्याची गरज नसल्याचे न्यायालयाच्या पत्रकात म्हटले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *