Monday , September 21 2026
Breaking News

जुन्या आठवणींना उजाळा; शहापूर येथील शाळा क्रमांक १९ च्या १९९३ बॅचचा आज गुरुवंदना व स्नेहमेळावा

Spread the love

 

बेळगाव : शाळेच्या आठवणी, मित्रांची साथ आणि गुरूंचे मार्गदर्शन या सगळ्यांना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी शहापूर येथील शाळा क्रमांक १९ च्या १९९३ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी एकत्र येत आहेत. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच जुन्या मित्रमैत्रिणींशी भेट घडवून आणण्यासाठी गुरुवंदना व माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम अळवण गल्ली, शहापूर येथील शाळा परिसरात आज बुधवार, दिनांक २० मे रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. गुरुवंदना उपक्रमांतर्गत निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार असून, त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रंगणार आहे.

कार्यक्रमात सामूहिक स्पर्धा, मनमोकळ्या गप्पा, आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील अनुभव कथन यांसारखे उपक्रम ठेवण्यात आले आहेत. या निमित्ताने अनेक वर्षांनी एकत्र येण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.

या कार्यक्रमास शाळेचे सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उपस्थित राहून स्नेहमेळावा यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *