Sunday , July 26 2026
Breaking News

सततच्या विजेच्या खेळखंडोब्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व मुख्य जलवाहिन्या अनेक भागात फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागासह उपनगरातील पाणी पुरवठावर परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावा धाव करावे लागत असून पाण्याचे टँकर मागावे लागत आहेत. परिणामी सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक फटका बसत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमतर्फे विद्युत वाहिन्या खांबांची दुरुस्ती केली जात आहे. याशिवाय पावसाळ्यात अडथळा होणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यात येत आहेत. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे.
शहर पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणी उपसा बंद पडलेला आहे. ऐन उन्हाळ्यात होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याचा जनजीवनावरही परिणाम झाला असून नागरिकांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती असल्याने उसाच्या इतर पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.मागील काही दिवसांपासून शहर पाणीपुरवठा योजनेच वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. तरी हेस्कॉमने पाणीपुरवठा करणाऱ्या फिडरवरील वीज पुरवठा सुरळीत करून पाण्याविना होणारे गैरसे दूर करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *