Sunday , September 20 2026
Breaking News

महात्मा गांधी रुग्णालयाजवळील भुयारीमार्ग खुला केल्याने वाहतूक सुरळीत

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील महात्मा गांधी रुग्णालयाजवळील नवीन भुयारी मार्ग अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या भुयारी मार्गामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात आली असून वाहनचालक आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
महामार्गावरील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. महामार्ग ओलांडताना स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून जावे लागत होते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या भुयारी मार्गाची निर्मिती केली आहे. खरी कॉर्नरवरील भुयारी मार्गाचे कामही अंतिम टप्प्यात असून हा मार्गही लवकरच वाहतूकीसाठी खुला होणार आहे. हा मार्ग खुला झाल्याने महामार्गापलिकडील डोंगर भागातील नागरीकांची गैरसोय दूर झाली आहे.
या भुयारी मार्गामुळे महामार्गावरील अवजड वाहतूक वरच्या उड्डाणपुलावरून वेगाने पुढे जाईल, तर स्थानिक आणि हलकी वाहने भुयारीमार्गाचा वापर करून शहरात प्रवेश करू शकणार आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण या भुयारी मार्गामुळे कमी होण्यास मदत होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *