Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीतील पर्यावरण प्रेमी शिक्षकाने दिला उत्तरकार्याला पर्यावरण संवर्धनाची दिशा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : म्हाकवे येथील अनुसया भाऊ पाटील यांच्या उत्तरकार्याच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम पार पडला. निपाणीतील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी धार्मिक विधींना पर्यावरणपूरक दिशा देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे आयोजित रोप लागवड केलेल्या आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
पारंपरिक पद्धतीने नदीत रक्षा विसर्जन करण्याऐवजी शेताच्या बांधावर महोगणी, उंबर, कांचन, पिंपळ आणि करंज यांसारख्या १० ते ११ फूट उंचीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांच्या मुळाशी रक्षा अस्थी विसर्जित करून “मृत्यूनंतरही निसर्गासाठी योगदान” हा अत्यंत संवेदनशील आणि समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला.
उत्तरकार्याच्या कार्यक्रमात उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना गुलाब व जास्वंदाची रोपे तसेच “करू पर्यावरणाचे रक्षण” हे पर्यावरण जनजागृतीपर पुस्तक भेट देण्यात आले. पारंपरिक धार्मिक कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या या संकल्पनेमुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
यावेळी शाहू शिक्षक आघाडी प्रमुख सुनील पाटील यांनी, पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांच्या कार्याचे कौतुक करून आजच्या काळात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे आवश्यक आहे. नामदेव चौगुले यांनी उत्तरकार्यालाही समाजप्रबोधनाचे माध्यम बनवत पर्यावरण संरक्षणाची नवी दिशा समाजासमोर ठेवली आहे. वृक्षलागवड, रोप भेट आणि पर्यावरण विषयक पुस्तक वाटप हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास बाबुराव पाटील, सुधीर पाटील, विठू पाटील, बाजीराव पाटील, राजराम पाटील, चंद्रकांत पाटील, दत्तात्रय पाटील, सचिन पाटील, अवधूत हवालदार, कृष्णा पाटील, धर्मराज हळदकर, संजय माळी, रुक्मिणी चौगुले, खंडू फेगडे, मीरा फेगडे, सुकुमार चौगुले, सुमन पाटील, सोनल पाटील, लता पोवार, रखमाबाई चौगुले आणि अंजली पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *