Monday , September 21 2026
Breaking News

ज्योती सेंट्रल स्कूलच्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विकास महामंडळ, मुंबई आणि शाहू प्रकाशन, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योती कॉलेज, बेळगाव येथे बेळगाव शहर आणि शहरालगत असणाऱ्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शाळांतील सी.बी.एस.ई. (CBSE) आणि स्टेट बोर्ड दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.
यावेळी व्यासपीठावर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजाभाऊ पाटील, सचिव श्री. विक्रम पाटील, सहसचिव श्री. डॉ. दीपक देसाई, सरसचिव श्री. पी. पी. बेळगांवकर, संचालक श्री. बाळाराम पाटील, श्री. मोहन बी. निर्मळकर, श्री. अनंत एस. देसाई तसेच श्री. सुरेश पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या सी.बी.एस.ई. दहावी बोर्डाच्या मराठी विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करणाऱ्या अदिश्री अशोक पाटील, आदर्श राजकुमार पाखरे आणि तनिष्का रमेश कोकीतकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, मानचिन्ह, एक हजार रुपये रोख रक्कम व भेटस्वरूप पुस्तक देऊन विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *