Sunday , July 26 2026
Breaking News

भारत विकास परिषदेतर्फे दहावी-बारावी परिक्षेत शहरात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान व शिष्यवृत्ती प्रदान

Spread the love

 

बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या बोर्ड परिक्षेत बेळगाव शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात विशेष सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक आणि समाजसेवक सुहास चांडक उपस्थित होते.
प्रारंभी स्वरा मोरे आणि पूर्णा प्रभू यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. मुख्य अतिथिंच्याहस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. स्वाती घोडेकर यांनी अतिथींची ओळख करून दिली. पांडुरंग नायक परिषदेच्या कार्याची माहिती दिली. मुख्य अतिथी सुहास चांडक यांनी आपले प्रेरणादायी विचार व्यक्त केले.
इंग्रजी माध्यमात शहरात सर्वप्रथम आलेल्या संजोता पांडुरंग व्हावळ ९९.५% (६२२/६२५, सेंट मेरीज स्कूल), मराठी माध्यमात शहरात प्रथम आलेला सोहम सतीश हळदणकर ९८.५% (६१६/६२५, मराठी विद्यानिकेतन) व कन्नड माध्यमात प्रथम अनुषा बसवराज कन्नाळ ९८.७% (६१७/६२५, उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल), त्याचप्रमाणे बारावीच्या परीक्षेतून वाणिज्य विभागात प्रथम ध्वनी संतोष कुलकर्णी ९९.८% (५९९/६००, गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स), विज्ञान विभागात प्रथम समीर कल्लापूर ९९.३% (५९६/६००, केएलई स्वतंत्र पदवीपूर्व कॉलेज) व कला विभागात प्रथम सृष्टी चिदानंद सलोनी ९९% (५९४/६००, लिंगराज पदवीपूर्व कॉलेज) यांना रोख स्कॉलरशिप, खास प्रशस्तीपत्र आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन पालकांसह मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले. यावेळी भारत विकास परिषदेच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांनाही खास पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
प्रा. अरुणा नाईक यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. व्ही. आर. गुडी यांनी कार्यक्रम संयोजन केले. सेक्रेटरी के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य व्ही. एन्. जोशी, डॉ. जे. जी. नाईक, विनायक घोडेकर, डी. वाय. पाटील, सुभाष मिराशी, गणपती भुजगुरव, पी. एम्. पाटील, जया नायक, शुभांगी मिराशी, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, मंगल कुलकर्णी, ज्योती प्रभू, अक्षता मोरे, प्रा. प्रतिभा हल्लेपनवर आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *