Monday , September 21 2026
Breaking News

शिवम असोसिएट्स पाठोपाठ अन्य चार संशयित कंपन्या पोलीस रडारवर

Spread the love

 

बेळगाव. – बेळगाव जिल्ह्यात ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप शिवम असोसिएट्सवर झाल्यानंतर, जिल्ह्यातील आणखी चार बोगस कंपन्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त मोहम्मद रोशन यांनी दिली.

सोमवारी एका कन्नड वृत्तपत्राशी बोलताना मोहम्मद रोशन म्हणाले, गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात केपीआयडी (KPID) आणि बड्स (BUDS) कायद्याअंतर्गत एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गेल्या २०२५ मध्ये केपीआयडी अंतर्गत संशोधन सुरू करण्यात आले होते. जिल्हास्तरीय उपायुक्तांना यासंदर्भात विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार एक जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

आम्ही सोशल मीडिया, प्रसारमाध्यमांमधून येणाऱ्या बातम्या किंवा येऊन तक्रार करणाऱ्या व्यक्तींकडून, निनावी तक्रारी विचारात घेऊन माहिती गोळा करत असतो. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात मी शहर पोलीस आयुक्तांशीही चर्चा केली आहे.आणखी चार बोगस कंपन्यांपैकी एका कंपनीने ५% व्याज देण्याची घोषणा केली असल्याची माहिती मिळाली आहे. लवकरच योग्य ती सविस्तर माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

शहर पोलीस आयुक्त डिजिटल तपास करत आहेत. अहवाल आल्यानंतर त्या बोगस कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल, मोठ्या बँका वार्षिक ९% व्याज देऊ शकत नाहीत. जनतेने अधिक पैशाच्या अमिषाला बळी पडू नये. तुम्ही अशा बोगस कंपन्यात पैसे जमा केल्यास तुमचे पैसे सुरक्षित नाहीत. आम्ही जिल्ह्याला पॉन्झी (फसवणूक करणाऱ्या) कंपन्यांपासून मुक्त करू. गेल्या वर्षी महिलांनी येऊन मायक्रोफायनान्समध्ये फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. आता आम्ही अशा फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना मुळापासून उखडून त्यांना नेस्तनाबूत करू. ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे, असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *