Sunday , July 26 2026
Breaking News

गरिबांचे घरकुलाचे स्वप्न महागाईच्या विळख्यात

Spread the love

 

शासनाकडून हप्ते थकल्याने लाभार्थींची परवड; सर्वसामान्यांचे गणित बिघडले

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबासाठी शासनामार्फत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, इंदिरा आवास, राजीव गांधी योजना आदी योजना राबवल्या जात आहेत. पण योजनांची हप्ते वेळेवर मिळत नसल्याने सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुल तयार करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने या घरकुलासाठी निधी उपलब्ध करून सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी लाभार्थी मधून होत आहे.
महागाईमुळे गोरगरीब नागरिकांचे घर बांधण्याचे स्वप्नांना महागाईचा अडसर निर्माण होत आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्याने सर्वांना घर बांधून लम्न करण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. बांधकाम साहित्य खरेदीसाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे अनेकांचे घराचे स्वप्न अधुरेच राहत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते, त्यामुळे टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. सध्याच्या स्थितीत बांधकामांसाठी आवश्यक असलेली विटांच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. विटांचे दर वाढले आहेत.लोखंड, वाळू, सिमेंटचे दर असे बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडाचे दर५ हजार ८०० ते ६ हजारांपर्यंत आहेत. बांधकामासाठी लागणारी वाळूचे दर ४ ते ५ हजार ब्रास प्रमाणे आहेत. या सर्वांना एकत्र जोडणाऱ्या सिमेंटचे दर साडेतीनशेवर झाल्याने सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्न भंग होत आहे. शासनाने सध्या तालुका व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरकुलांना मंजुरी दिली आहे. बांधकाम करण्यासाठी लागणारी वाळू, विटा, मुरूमाच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे अवाच्या सव्वा भावाने तस्करांकडून वाळू विकत घ्यावी लागत आहे.
सध्या अनेक नागरिकांना हक्काचे घर नसल्याने भाड्याने राहावे लागत आहे. जुनी घरे धोकादायक होत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. प्रत्येकाजवळ हक्काचे घर असावे यासाठी अडीच लाखांपर्यंत अनुदान देते. पण वेळेवर मिळत नसल्याने घर बांधणे कठीण झाले आहे. बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमती पाहता अनेक नागरिक हे आपले घर बांधकाम अर्ध्यावरच थांबत असल्याचे प्रकार ग्रामीण भागात दिसून येत आहेत.
——————————————————————-
‘शासनाकडून प्रत्येक गावात घरकुल योजना मंजूर केली आहे. पण त्याचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याने घराचे स्वप्न अधुरे राहत आहे. तरी संबंधितांनी लाभार्थ्यांना वेळेवर रक्कम देऊन त्यांचे घर पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे.’
-इंद्रजीत सोळांकुरे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, अक्कोळ

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *