Sunday , July 26 2026
Breaking News

घरकुल लाभार्थ्यांचे नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन

Spread the love

 

पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्याची मागणी : बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची भेट

निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील नागरिकांना ६०० घरकुल वितरण कार्यक्रम होणार आहे. या घरकुल योजनेतील सर्व ९४८ लाभार्थीचही नावे लॉटरी प्रक्रियेद्वारे निवडण्यात येऊन सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा, या मागणीसाठी अन्यायग्रस्त नागरीकांतर्फे निपाणी पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. घरकुल योजनेतील वंचित, गोरगरीब आणि सर्व पात्र नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे. ज्यांनी पूर्ण रक्कम भरली आहे अशा प्रत्येक लाभार्थ्यांना घरकुल मिळावे अशी मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर निपाणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सर्व रक्कम भरलेल्या लाभाथ्यांची संपूर्ण यादी नोटीस बोर्डावर लावण्यास भाग पाडण्यात आले. लाभार्थी महिला ठिय्या मांडून बसल्या होत्या. त्यानंतर बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी तहसीलदार, सुरेश मुंजे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, सर्व ९४८ लाभार्थीना लॉटरी प्रक्रियेत समावून घ्यावे, अन्यथा ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, ज्यांची घरे आहेत, त्यांना वगळून जे नागरीक भाड्याच्या घरी राहतात त्यांनाच या घरकुलांचा लाभ मिळावा अशी मागणी केली. यावेळी मागणीचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. यावेळी तहसिलदारांनी जिल्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो न्यायमिळवून देऊ, असे आश्वासन दिले. रोहन साळवे यांनीही निवड प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून सर्वसामान्य जनतेला योग्य न्याय देण्याची मागणी केली. घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीपीआय बी. एस. तळवार, पीएसआय शिवानंद कारजोळ, शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी सुजय पाटील, राजेंद्र चव्हाण, विजय शेटके, किरण कोकरे, अरूण आवळेकर, संजय चव्हाण, गजेंद्र पोळ, युवराज पोळ, जिवन घस्ते, किसन दावणे, संजय कांबळे, प्रविण हेगडे, अस्लम शिकलगार, दिपक सावंत, रामा निकम, झाकीर कादरी, जावेद कोल्हापूरे, बाळासाहेब कमते, यांच्यासह घरकुल योजनेतील लाभार्थी, नागरीक उपस्थित होते.
——————————————————————–
विलास गाडीवड्डर यांची भेट
घटनास्थळी माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी भेट देऊन चर्चा केली. जे नागरीक घरकुलांपासून वंचित आहेत. त्यांनाच घरे देण्यात यावीत अशी मागणी केली.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *