निपाणी (वार्ता) : सोळांकूर (ता. राधानगरी) येथील प्रभारी प्राचार्य डॉ. विलास चव्हाण यांनी निपाणी येथील लेटेक्स कॉलनीतील श्री विश्वकर्मा उद्यानाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षण, संशोधन आणि पर्यावरण संवर्धनचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याची भावना व्यक्त व्यक्त केली. शिवाय उद्यानासाठी सतत धडपडणाऱ्या भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव …
Read More »कचरा, अतिक्रमण, पाणीटंचाईमुळे निपाणीकर बेजार
बाजारपेठ भागात रस्त्यांवरच वाहनांचे पार्किंग; नागरिकांना चालणेही झाले कठीण निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका सभागृहाचा कालावधी संपल्याने शहराचा डोलारा प्रशासकीय यंत्रणेवर उभा आहे. शहरात सध्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मध्यवर्ती आणि बाजारपेठेच्या महत्वाच्या भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून, अस्वच्छता, ड्रेनेजची दुरवस्था, अतिक्रमण, अपुरा पाणीपुरवठा आणि वाहतूक …
Read More »खरिपाच्या हंगामासाठी प्रमाणित बियाणे उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी रयत संघटनेचे निवेदन
निपाणी (वार्ता) : यंदाच्या खरीप हंगामाला पंधरा दिवसात प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एक संपर्क केंद्रासह इतर ठिकाणी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे व तांत्रिक मार्गदर्शनाची कमतरता भासू नये. कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. येत्या खरीप हंगामात सिंचनाच्या साधनांचा अधिक वापर करावा. पीएम-किसान, पीकविमा व आधुनिक तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत …
Read More »मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांचा दुजोरा
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला दुजोरा देत, “हायकमांडने बोलावल्यासच मी दिल्लीला जाईन. या महिन्याच्या १५ तारखेला दिल्लीला जाण्याचा कोणताही कार्यक्रम नाही,” असे स्पष्ट केले. म्हैसूर येथील आपल्या निवासस्थानासमोर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि शैक्षणिक विषयांवर भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले, “आम्ही सर्वजण हायकमांडच्या आदेशानुसार …
Read More »कर्नाटकमध्ये ५.५५ कोटी मतदारांची पडताळणी
देशभरात मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहीम बंगळूर : देशातील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता कायम राखण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकासह देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सघन पुनरावलोकन – तिसरा टप्पा’ राबविण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेतील घरगुती नोंदणी …
Read More »सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून पेन्शन सुरू करा : प्रसाद पाटील यांचे तहसीलदारांना निवेदन
21 हजार दिव्यांग, विधवा व वृद्धांच्या पेन्शनवर गंडांतर खानापूर : खानापूर तालुक्यातील सुमारे 21 हजार दिव्यांग, विधवा आणि वृद्धांच्या पेन्शनवर महसूल विभागाने स्थगिती दिल्याने संबंधित लाभार्थ्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. ही गंभीर समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी गर्लगुंजी …
Read More »नागुर्डा येथे श्री नागेश महारुद्र मंदिराचा उद्घाटन सोहळा; आमदार श्री. रोहित आर. आर. आबा पाटील उपस्थित राहणार
खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा व विश्रांतवाडी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील जिर्णोद्धार करण्यात आलेल्या स्थळ दैवत व ग्रामदैवत श्री नागेश महारुद्र मंदिराच्या पुनः प्राणप्रतिष्ठापना व भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि. १४ मे २०२६ ते शनिवार दि. १६ मे २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या तीन दिवसीय धार्मिक …
Read More »नव्याने बांधलेले स्मशान शेड वापराविना पडून; नगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊनही दुर्लक्ष
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका प्रशासनातर्फे अनेक वर्षांपूर्वी शहराच्या पूर्वेला असलेल्या स्मशान मारुती मंदिराशेजारी स्मशान शेडची निर्मिती करण्यात आली होती. वारंवार हे शेड खराब होत असल्याने पावसाळ्यात मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन नगरपालिकेने या परिसरातच नव्याने स्मशान शेड उभारले आहे. पण ते वापराविना …
Read More »धर्मवीर संभाजीराजे चौकात संभाजीराजे जयंती कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री संभाजी राजे चौकात गुरुवारी (ता.१४) छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व बेळगाव बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर पुष्पहार चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांनी अर्पण केला तर श्रीफळ राजेश कदम यांनी …
Read More »हलशी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरकडून रुग्णाला उद्धट वागणूक; रेशन कार्ड नसल्याने नाकारले उपचार
खानापूर : सरकारी रुग्णालय हे गरिबांसाठी मंदिर असायला हवे, पण हलसीमध्ये रुग्णाला उपचारांऐवजी रेशन कार्ड विचारले जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरून एका महिला नेत्याने डॉक्टरांची चांगलीच शाळा घेतली. खानापूर तालुक्यातील हलशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रमेश पाटील यांच्या निष्काळजीपणामुळे दोन महिला रुग्ण अडचणीत आल्या. हत्तरवाड गावातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta