






खानापूर : हलशीवाडी (ता. खानापूर) येथे दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून मंगळवार, दि. १० रोजी दुपारी ४ वाजता एक माणसाने बैलगाडा ओढण्याच्या जंगी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसांसह चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २०० रुपये असून, प्रत्येक स्पर्धकाला आपले कौशल्य दाखविण्यासाठी एक मिनिटाचा वेळ देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धेच्या अर्धा तास अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेतील
प्रथम क्रमांक : ५,००० रुपये – वसुंधरा भास्करराव देसाई (कोल्हापूर) यांच्या स्मरणार्थ विष्णू रामचंद्र देसाई (उद्योजक, पुणे) यांच्याकडून.
द्वितीय क्रमांक : ४,००० रुपये – महेश्वर वसंत देसाई (उद्योजक, गोवा) यांच्याकडून.
तृतीय क्रमांक : ३,००० रुपये – महेश (बाळू) गंगाराम जाधव, अध्यक्ष, लक्ष्मीदेवी यात्रा कमिटी यांच्याकडून.
चतुर्थ क्रमांक : २,००० रुपये – निवृत्त सुभेदार शंकर अमृत देसाई यांच्याकडून.
पाचवा क्रमांक : १,५०० रुपये – अजित शंकर देसाई (उद्योजक, वडगाव) यांच्याकडून.
सहावा क्रमांक : १,००० रुपये – महेश वामन देसाई (उद्योजक) यांच्याकडून.
सातवा क्रमांक : ७५० रुपये – मयूर विष्णू गुरव (हलशी) यांच्याकडून.
आठवा क्रमांक : ७०१ रुपये – निंगाप्पा होसुर, अध्यक्ष, मानव हक्क यांच्याकडून.
याशिवाय, प्रकाश कडगावकर (हलगा), उद्योजक, नायजेरिया यांच्याकडून स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन तसेच परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी
मिलिंद देसाई ७७६०६८८७१० किंवा शुभम देसाई ७०२६१७९०४१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta