Sunday , November 22 2026
Breaking News

चोर्ला घाटाने घेतले आणखी दोन बळी; बेळगाववर शोककळा

Spread the love

 

बेळगाव : दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी गोव्याला गेलेल्या बेळगावच्या दोन युवकांचा परतीच्या प्रवासात चोर्ला घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. रविवारी (ता. ८) सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास बेळगाव-चोर्ला मार्गावरील घाट परिसरात हा अपघात घडला. या दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

निलेश बडाचे (वय २७, रा. नाथ पै नगर, अनगोळ) आणि साहिल कनकुले (वय २७, रा. बसवण्ण गल्ली, शहापूर) अशी मृत युवकांची नावे आहेत.

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त हे दोघे मित्र गोव्याला फिरण्यासाठी गेले होते. तेथून दुचाकीवरून बेळगावला परतत असताना चोर्ला घाटात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याशेजारील खांबाला जोरात धडकले. धडक इतकी भीषण होती की, दोघेही दुचाकीवरून दूर फेकले गेले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातातील मृतदेह आणण्यासाठी घटनास्थळी गेलेली रुग्णवाहिकाही रस्त्याशेजारील खड्ड्यात गेल्याची माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे, रविवारी सकाळी खानापूर तालुक्यातील एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर सायंकाळी चोर्ला घाटात आणखी दोन युवकांचा बळी गेल्याने जांबोटी-चोर्ला मार्गावर एकाच दिवशी तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

या सलग दुर्घटनांमुळे बेळगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चोर्ला घाटातील अपघातांची मालिका पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनली असून, वाहनचालकांनी घाटमार्गावर वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन केले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *