Monday , May 25 2026
Breaking News

कर्नाटक

हिंदीसह तृतीय भाषेला गुण नाहीत, फक्त ग्रेड

  दहावी परीक्षेत मोठा बदल; एकूण गुण ६२५ वरून ५२५ बंगळूर : राज्य सरकारने दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षापद्धतीत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला असून, तृतीय भाषेच्या (हिंदी किंवा इतर भाषा) गुणांना आता एकूण गुणांमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. याऐवजी त्या विषयासाठी केवळ ‘श्रेणी’ (ग्रेड) देण्यात येणार आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री …

Read More »

पहिलीत प्रवेशासाठी वयोमर्यादेत सवलत; २०२६-२७ साठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

    बंगळूर : सहा वर्षे पूर्ण न झालेल्या मुलांच्या पालकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. पहिलीत प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे बंधनकारक या नियमात २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी सवलत देण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांनी विधानसभेत घोषणा केली. मंत्र्यांनी सांगितले की, पहिलीत प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे …

Read More »

निपाणीतील श्रीराम नवमी उत्सवाची पालखी सोहळ्यासह विविध कार्यक्रमाने सांगता

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात गेल्या नऊ दिवसापासून रामनवमी सोहळ्यानिमित्त विविध येथील बेळगाव नाक्यावरील श्रीराम मंदिरासह इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहर आणि उपनगरात चैतन्याचे वातावरण पसरले होते. या रामनवमी उत्सवाची पालखी सोहळ्याने शुक्रवारी (ता.२७) सांगता करण्यात आली. सांगता सोहळा निमित्त येथील श्रीराम मंदिरात सकाळी …

Read More »

तृतीय भाषा परीक्षेला गुणांऐवजी ग्रेड; शिक्षण मंत्री बंगारप्पांच्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

  बेंगळूरू : कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री बंगारप्पा यांनी केलेल्या नव्या घोषणेमुळे राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तृतीय भाषा विषयाच्या परीक्षेला शंभर गुण वजा करून केवळ ग्रेड देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने हा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मारक ठरणार असल्याची तीव्र प्रतिक्रिया …

Read More »

जनहित जपलं नसतं तर १७ अर्थसंकल्प मांडता आले नसते : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बंगळूर : राज्याचे हित आणि जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने काम केल्यामुळेच मला विक्रमी १७ अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली, असा सवाल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. विरोधकांवर टीका करत त्यांनी आपल्या कामगिरीचे जोरदार समर्थन केले. अर्थसंकल्पावरील चर्चेत भाजपचे १४, काँग्रेसचे १० आणि धजदचे २ अशा एकूण २६ सदस्यांनी सुमारे १४ …

Read More »

भीमापूरवाडीत रामनवमीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

  निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघातील भिमापुरवाडी गावातील मर्यादा पुरुषोत्तम श्री राम मंदिरामध्ये जन्मोत्सवानिमित्त करण्यात आले होते. त्याला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रामाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य व कर्नाटक राज्य ओसीसीआय संचालक राजेंद्र -पवार वडर यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात …

Read More »

बोरगाव येथील मराठा समाज जागेसाठी उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरातील मराठा समाजासाठी जागा उपलब्ध व्हावी, या मागणीसाठी सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला जागा मिळावी, यासाठी नगरपंचायतीच्या मासिक सभेत ठराव करण्यात आला होता. या कार्याला गती मिळून समाजाला तात्काळ जागा मिळून समाजाचे …

Read More »

आध्यात्मिक प्रगतीसाठी दत्तपाठ पुस्तकेचा उपयोग

  परमात्माराज महाराज ; पुस्तक प्रकाशन सोहळा निपाणी (वार्ता) : भगवान् दत्तात्रेय स्वरूप हे दत्तपाठ समन्वयस्वरूप आहे. विविध संप्रदायांना एकत्र आणून व्यावहारिक जीवनातील अडचणी दूर करून आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी दत्तपाठ या सत्संग्रह रूपिणी पुस्तिकेचा उपयोग निश्चितच होणार आहे, असे मत परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी) येथील …

Read More »

चिक्कोडी, निपाणीतील घरगुती सिलेंडरच्या काळा बाजाराची चौकशी करावी

    सामान्यांच्या गॅसवर डल्ला मारणाऱ्यावर कारवाईची मागणी निपाणी (वार्ता) : चिक्कोडी आणि निपाणी परिसरातील घरगुती गॅस वितरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येत आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी नियमानुसार गॅस बुकिंग करूनही ८ ते १० दिवस उलटून गेले तरी त्यांना गॅस सिलिंडर मिळत नाही. डीसीए किंवा इतर कारणे देत …

Read More »

कारदगा येथील पीर बंगाली ऊरुसातील शर्यतीत अजित गावडे यांची बैलगाडी प्रथम

  निपाणी (वार्ता) : कारदगा येथील पीर बंगाली ऊरुसातील शर्यतीत अजित गावडे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून १५ हजार एक रुपयाचे बक्षीस व निशान मिळवले. येथील रेंदाळ रस्त्यावर या शर्यती घेण्यात आल्या. यात्रा कमिटी पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते या शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये राहुल यादव- विकास कोरे …

Read More »