Tuesday , September 22 2026
Breaking News

युवा पिढीने स्वावलंबनाचा विचार अंगिकारावा; कांतीलाल राठोड

Spread the love

 

कुर्ली हायस्कूलमध्ये डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती

निपाणी (वार्ता) : महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागात ज्ञानाची गंगा पोहोचवली. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या स्वावलंबनाच्या विचारांचा अंगिकार करणे गरजेचे असल्याचे, मत निपाणी येथील ज्येष्ठ समाजसेवक कांतीलाल राठोड यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जी. जी. निकाडे होते.
जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी गावातून सवाद्य प्रभातफेरी काढली. विश्वनाथ पाटील व कुमार माळी यांच्या हस्ते ट्रॉली पूजन व अरुण निकाडे यांच्या हस्ते मिरवणूकीचे उदघाटन झाले. यावेळी मुलींनी लेझीम खेळाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. “कमवा आणि शिका” व “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” यांसारख्या प्रेरणादायी घोषणा देण्यात आल्या.
टी. एम. यादव यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे भूषण करून दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर कर्मवीरांनाअभिवादन केले.
अक्षता निकाडे, सिद्धी शिंदे व शुभदा कोकणे यांनी कर्मवीरांच्या जीवनकार्यावर आणि त्यांच्या संघर्षावर मनोगत व्यक्त केले. ए. ए. चौगुले यांनी पारितोषिक अहवाल वाचन केले.
शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. राठोड यांनी कर्मवारी भाऊराव पाटील यांनी, खेडय़ापाडय़ात माध्यमिक शिक्षण देणाऱ्या विद्यालयांची स्थापना केली. त्यामुळे विविध विद्यालयातून सध्या हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून कृत्रिम बुद्धिमत्ता व स्पर्धात्मक शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्याचे सांगितले.
यावेळी राठोड यांनी विद्यालयास सॅनिटरी नॅपकिन व्हेडिंग व डीसपोजल मशीन देणगी स्वरूपात दिली. विश्वनाथ पाटील, मुख्याध्यापक एस. एस. चौगुले, आनंदा ढगे, मनोज निकाडे, संतोष निढोरे, बी एस हेरवाडे, सीताराम चौगुले, एस डी वडराळे, नानासाहेब पाटील, आप्पासाहेब लोकरे, प्रल्हाद प्रताप, रणजित माने, सुभाष निकाडे, दिगंबर माने, लक्ष्मण यादव, एम एच बरगाले, राजाराम पाटील, नामदेव पाटील, विलास पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. ए. ए. चौगुले यांनी सूत्रसंचालन तर के. ए. नाईक यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कुर्लीत कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व पारितोषिक वितरण कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *