Tuesday , November 24 2026
Breaking News

खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी कधी?

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका बीईओ ऑफिसला गेली दोन महिने कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी नसल्याने शिक्षण क्षेत्राची मोठी गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे. समाज माध्यमातून याबाबत बातमी वाचल्यानंतर खानापूर युवा समितीचे अध्यक्ष तथा युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी खानापूर येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला भेट दिली असता ही माहिती समोर आली.

यापूर्वी येथे गट शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेले रामाप्पा हे दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर या पदावर कोणाचीही कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आलेली नाही. सध्या गट समन्वयक अधिकारी मंजुनाथ हत्ती यांच्याकडे केवळ प्रभारी (इन्चार्ज) म्हणून या पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे, अशी माहिती येथील व्यवस्थापक प्रकाश होसमनी यांनी दिली.

शिक्षण क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचे असून खानापूर तालुका हा क्षेत्रफळाने मोठा व दुर्गम भागाने व्यापलेला आहे.मंजुनाथ हथी यांच्याकडे बीआरसी चाही अधिभार असल्याने तालुक्याला पूर्ण वेळ देणे कठीण आहे, त्यामुळे येथे कायमस्वरूपी अधिकारी असणे गरजेचे आहे. कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने शिक्षकांच्या, शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अनेक कामांमध्ये अडथळे येत आहेत.

या संदर्भात येत्या एक-दोन दिवसात जिल्हा शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन खानापूर तालुक्याला तात्काळ कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी नेमण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी नियुक्ती होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीचे पैसे कर्जफेडीसाठी वळते केल्यास बँकांवर कारवाईचा इशारा

Spread the love  गॅरंटी योजनांच्या आढावा बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले; रेशन वितरणातील अनियमिततेवरही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *