








निपाणीत शोकसभा
निपाणी (वार्ता) : आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, संशोधक आणि वैचारिक कार्यकर्ते प्रा. डॉ. संभाजी बिरांजे यांच्या निधनाने आंबेडकर चळवळीची वैचारिक हानी झाली आहे. एक उत्तम संशोधक व अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना येथे आयोजित शोकसभेत व्यक्त करण्यात आली.
डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार मंच, जत्राट वेस आणि किसन दावणे, सर्जेराव हेगडे, निपाणी यांच्या माध्यमातून शासकीय विश्रामगृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
प्रा. डॉ. अच्युत माने व सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. त्यानंतर डॉ. बिरांजे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या जुन्या आठवणींना व सामाजिक, वैचारिक कार्याला उजाळा देण्यात आला. सर्जेराव हेगडे यांनी स्वागत तर पसुधाकर माने यांनी प्रास्ताविक केले. किसन दावणे यांनी डॉ. बिरांजे जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. सुधाकर माने यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा गाढा अभ्यास असलेले संशोधक आणि अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी संदेश सुतार, संदीप खोत, अमित शिंदे, संदीप माने, सर्जेराव हेगडे, माजी उपप्राचार्य आर. के. दिवाकर, प्रा. जी. डी. कांबळे यांनी, डॉ. बिरांजे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी अरीश सनदी, उदय वंटे, अविनाश माने, भरत रोडे, अशोक लाखे, सुशील कांबळे, दीपक मधाळे, किसन कांबळे, दीपक माळगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta