Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

जांबोटीत सायकल स्पर्धेचा थरार, दत्तराज सडेकर याने मारली बाजी

  जांबोटी : जिंकण्यासाठीचा प्रचंड आत्मविश्वास त्यातून चाकाने घेतलेला भरधाव वेग, प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून पुढे जाण्याची धडपड, अन प्रेक्षकात होणारा जल्लोष असा सायकलिंग स्पर्धेचा थरार जांबोटी येथे अविस्मरणीय ठरला. गिअरहेड स्टुडिओज बेळगाव व विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय जांबोटी यांच्या संयुक्त विद्यमाने सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण …

Read More »

मत्तीवडे येथे घराला आग लागून; रोख रक्कमेसह प्रापंचिक साहित्य जळून खाक

  निपाणी (वार्ता) : शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून रोख रक्कमेसह प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. ही घटना मत्तीवडे (ता. निपाणी) येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जागृततेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रामचंद्र कांबळे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे घरातील …

Read More »

कणकुंबी हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आणि बक्षिस वितरण संपन्न

  कणकुंबी : विश्व भारत सेवा समितीच्या कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयातील दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आणि शिष्यवृत्ती वितरण असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीत आणि ईशस्तवनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फोटो पूजन करण्यात आले. यावेळी …

Read More »

वस्त्रोद्योग खात्यातील कोट्यावधी रुपयाचा निधी लाटला

  बोरगाव येथे बैठक ; कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनी बोगस दाखले व कागदपत्रे देऊन कर्नाटक राज्याचा वस्त्रोद्योग खात्यातील कोट्यावधी रुपयाचा निधी लाटला आहे. काहींचे व्यवसाय बंद तर काहींनी भाडेतत्त्वावर इतरांना दिले आहे. या वस्त्रोद्योग पार्कात कोटधावधी …

Read More »

खानापूरच्या माजी आमदार, एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांची काँग्रेस महिला राष्ट्रीय अधिवेशनात उमटली छाप

  नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील इंदिरा भवन येथे आयोजित ओबीसी काँग्रेस महिला राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हस्ते पार पडले. या अधिवेशनास देशभरातून अनेक महिला प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला. या अधिवेशनादरम्यान खानापूरच्या माजी आमदार, एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी देखील सहभाग घेतला होता. …

Read More »

नारीशक्तीत देश चालवण्याची ताकद; महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणासाठी महिला दिन साजरा

  खानापूर : नारीशक्ती ही फार मोठी शक्ती असून महिला तालुका, जिल्हा तसेच देशही सक्षमपणे चालवू शकते, हे आपण अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणासाठी महिला दिन साजरा केला जातो, असे मत पंचहमी योजनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. खानापूर तालुका पंचहमी योजना समितीच्या वतीने मंगळवारी …

Read More »

कांद्याला सोसवेना गोणी दराचा ‘भार’

  शेतकऱ्यांच्या घामाला कवडीमोल भावः प्रतिशेकडा १ हजाराचा दर निपाणी (वार्ता) : बंगळूर येथील कांदा बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये रिकाम्या गोणीचा दर जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. १८ ते २० प्रतिकिलो रुपयांच्या दराने कांदा विका लागत असताना, तीच कांदा बारदाण्याच्या गोणीमध्ये भरला जातो. …

Read More »

महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्दमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित संस्थेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकारत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी होते. संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर, श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या …

Read More »

युद्धाचा भडका अन् गॅस टंचाईसह दरवाढीचा फटका

  हॉटेल व्यावसायिकांची धावाधाव; चढ्या दराने सिलिंडर घेण्याची वेळ निपाणी (वार्ता) : जागतिक स्तरावर युद्धाचा भडका उडाला, तसा गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे घरगुती गॅस २१ दिवसांनी मिळणार आहे, तर व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणे दुरापास्त झाले आहे. हॉटेल व्यावसायिक सिलिंडरसाठी दुप्पट रक्कम मोजत आहेत. तरीही त्यांना सिलिंडर …

Read More »

अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने बोरगाव सर्कल रुंदीकरणाचे काम ठप्प

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सर्कल परिसरात अतिक्रमण वाढल्याने वारंवार वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सर्कलचा रुंदीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. या कामाचा प्रारंभ ही मान्यवरांच्या हस्ते झाला. पण परिसरातील अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने सुरू झालेले रुंदीकरणाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह …

Read More »