Sunday , September 20 2026
Breaking News

हजारांचा दंड भरण्याऐवजी हेल्मेट घ्या; निपाणी शहरात विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहर पोलिसातर्फे हेल्मेट सक्ती केली आहे. पोलिस आयुक्तांच्या आवाहनानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनीथेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी चार दिवसात ४३ दुचाकीस्वारांवर १ हजार हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यापैकी २२ हजार रुपयांचा दंड जागीच वसूल केला. आता यापुढे दंड भरण्याऐवजी या पैशांत हेल्मेट खरेदी करून स्वतःला सुरक्षित ठेवा, असे आवाहनही पोलिसांनी केले.
पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत शहरातील विविध रस्त्यावर ही कारवाई केली आहे.
——————————————————————-
‘अपघाती मृत्यूंमध्ये दुचाकीचालकांचे प्रमाण ६० ते ७० टक्के आहे. हेल्मेटच्या वापरामुळे गंभीर दुखापती आणि मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. ही मोहीम केवळ दंडासाठी नसून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे’.
बी. एस.तळवार, मंडल पोलीस निरीक्षक,निपाणी

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *