Sunday , September 20 2026
Breaking News

हरतालिका, गणेश चतुर्थी एकाच दिवशी : तब्बल २६ वर्षांनंतर योग; पंचांगमधील माहिती

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : यंदा हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. १४ सप्टेंबर) आले आहेत. तब्बल २६ वर्षांनंतर असा योग जुळून आल्याची माहिती पौरोहित्यांनी दिली. यापूर्वी १९९६ आणि २००० मध्ये सुद्धा एकाच दिवशी हे दोन्ही सण आले होते. यावेळी हे सण एकाच दिवशी आल्याने आणि तिथीच्या गणनेमुळे यंदाचा गणेशोत्सव दहा किंवा अकरा दिवसांऐवजी बारा दिवसांचा असेल. उत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला २५ सप्टेंबरला होणार आहे. पंचांगानुसार तृतीया तिथीची सुरुवात १३ सप्टेंबरला सकाळी ७.०८ मिनिटांनी होऊन समाप्ती १४ सप्टेंबरला ७.०६ वाजता होईल.

शास्त्राप्रमाणे हरतालिका पूजनासाठी
सूर्योदयाला असलेली तृतीया तिथी आवश्यक असून श्री गणेशाच्या स्थापनेसाठी मध्यान्हाला असलेली चतुर्थी आवश्यक असते. यामुळे दोन्ही पूजा एकाच पंचांगांमध्ये आली आहे. यादिवशी सकाळी ७.०६ वाजताच्या आधी हरतालिकेची पूजा करावी. त्यासाठी शुभमुहूर्त सकाळी ६.२७ ते सकाळी ७.०६ पर्यंतच आहे. नंतरच मध्यान्हाला श्री गणेशाच्या मृण्मयी पयाय दिवशी करायच्या आहेत. ही मूर्तीची स्थापना आणि पूजन करावे. हरतालिकेच्या पूजेसाठी वापरलेली मूर्ती आणि पूजेच्या साहित्याचे विसर्जन केल्यानंतरच गणरायाची स्थापना करावी, असे सांगण्यात येत आहे. पण शास्त्रात असा कुठेही उल्लेख नसल्यामुळे दिवसभरात कधीही हरतालिकेची पूजा करून नेहमीप्रमाणे गणेशपूजन आणि स्थापना करावी.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *