
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील विविध प्रलंबित विकासकामांना मंजुरी देऊन ती तात्काळ मार्गी लावावीत, अशा मागणीचे निवेदन माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब हवले यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले. मंत्री सतीश जारकीहोळी बोरगाव येथे आले असता हावले यांनी त्यांची भेट घेऊन विविध विकासकामांबाबत निवेदन दिले.
निवेदनातील माहिती अशी, मातंग समाज व हरिजन वसाहतीतील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, अनेक वर्षांपासून सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरे नियमानुसार कायम करणे, हरिजन केरे येथे ८६ एकर जमीन असून याला संपर्क रस्ता करावा. मातंग समाजाच्या स्मशानभूमीला कंपाऊंड बांधणे, बोरगांव बंधाऱ्याचे दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करावेत त्यामुळे शेती पाण्यासह नागरिकांना पिण्याचा पाण्याचा कायमस्वरूपी मीटणार आहे. बंधाऱ्याच्या कामासाठी अनुदान मंजूर करावे. अतिक्रमण जागी असलेल्या नागरिकांना नवग्राम सारखे कॉलनीतील आश्रय कॉलनी निर्माण करून त्यांचे हक्काचे घर व जागा मंजूरीसाठी प्रयत्न करून आक्रम सक्रम योजना राबवावी, अशी मागणी केली.
या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे. निवेदनातील मागण्यांचा सकारात्मक विचार करून संबंधित विकासकामांना लवकरच मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देत मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta