Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

बोरगावात विकासकामासाठी आमदार जोल्लेंच्या प्रयत्नाने २.५० कोटींचा निधी : नगरसेवक शरदराव जंगटे यांची माहिती

  निपाणी (वार्ता) : माजी खासदार व डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्याने माजी मंत्री व निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव शहराच्या विकासासाठी पुन्हा अडीच कोटीचा निधी मंजुर झाल्याची माहिती श्री हालशुगर साखर कारखान्याचे संचालक व बोरगाव येथील नगरसेवक शरदराव जंगटे यांनी दिली. बोरगाव येथे आयोजित …

Read More »

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेने म्हाकवे येथील दुचाकीस्वार ठार

  निपाणी (वार्ता) : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील युवक ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता.१२) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सौरभ साताप्पा चौगुले (वय २५ रा. महाकवे ता.कागल) असे मृत युवकाचे नाव आहे याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून सौरभ चौगुले हा आपल्या दुचाकीवरून येथील हालसिद्धनाथ …

Read More »

श्री दत्त पद्मनाभ पीठात ‘श्री दत्त गुरुवार भक्ती उत्सव’ उत्साहात संपन्न

  खानापूर : श्री दत्त पद्मनाभ पिठाधीश्वर, अध्यात्म शिरोमणी, पद्मश्री विभूषित, गोवा स्वामी, प पू.सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य कृपाशीर्वादाने संत समाज खानापूर विभागाच्या वतीने गोवा राज्यातील कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पीठात श्री दत्त गुरुवार भक्ती उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात सद्गुरुंची पाद्यपूजा …

Read More »

काम चालू, रस्ता बंद असल्याने मांगुर फाटा, मुरगुड रोडवर वाहतुकीची कोंडी

  राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा परिणाम; नागरिकासह वाहनधारकांचा फेऱ्याने प्रवास निपाणी (वार्ता) : पुणे-बेंगळुर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील मुरगुड रोडवरील भुयारी मार्गाची एक बाजू आठवड्यापासून बंद करण्यात आली आहे. त्याशिवाय मांगुर फाटा जवळ यमगर्णी नदी पुला शेजारी काम सुरू असल्याने दोन्ही ठिकाणी दुसऱ्या विरोधी बाजूने दुहेरी …

Read More »

कलिंगड, द्राक्षांची आवक होऊनही दरवाढीमुळे ग्राहकांची खरेदीकडे पाठ

  निपाणी (वार्ता) : यावर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यापासून बचाव करण्यासाठी निपाणी बाजारपेठेत कलिंगड आणि द्राक्षांची आवक वाढत आहे. तरीही दरवाढ असल्याने ग्राहकांनी त्यांच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. सध्या कलिंगड आकारानुसार ५० ते १५० रुपये तर द्राक्ष प्रतिकिलो २६०ते २८० किलोप्रमाणे विक्री होत आहे. उन्हाळा …

Read More »

‘दावत-ए-इफ्तार’मध्ये बंधुभावाचे दर्शन

  सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यातर्फे आयोजन, हिंदू-मुस्लिम बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती निपाणी (वार्ता) : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त येथील दर्गाह गल्लीमध्ये बोरगावमधील सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यातर्फे रमजान निमित्त दावत-ए-इफ्तारचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (ता. १२) सायंकाळी मशीद समोर झालेल्या या कार्यक्रमाला हिंदू-मुस्लिम समाजबांधव उपस्थित राहून बंधुभावाचे दर्शन घडवले. रमजान महिन्यात …

Read More »

भाजप जिल्हा किसान मोर्चा उपाध्यक्षपदी सदानंद पाटील

  खानापूर : खानापूर तालुक्यातील तरुण नेतृत्व सदानंद मारुती पाटील यांची भारतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण जिल्हा किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील बिदरभावी गावचे युवा उद्योजक सदानंद पाटील यांनी अल्पवयातच आपल्या राजकीय कार्याचा ठसा उमटवला आहे. खानापूर येथील महालक्ष्मी शुगर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी …

Read More »

कर्नाटक काँग्रेसमध्ये नाराजीची लाट; काही मंत्र्यांच्या हकालपट्टीचे संकेत

  बंगळूर : काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काही मंत्र्यांवर कारवाई करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंत्र्यांकडून आमदारांना प्रतिसाद मिळत नाही, ते हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत आणि भेटीसाठीही उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी सत्ताधारी पक्षातील आमदारांनी बैठकीत मांडल्या. पोलीस तसेच इतर अधिकाऱ्यांच्या …

Read More »

ग्रामीण भागात तंबाखू चाखीची लगबग

  गुढीपाडव्याला होणार खरेदीचा मुहूर्त; प्रति किलो २०० रुपये दराची शेतकऱ्यांना अपेक्षा निपाणी (वार्ता) : शहरासह ग्रामीण भागात तंबाखू कापणी व भरणीची कामे पूर्णत्वास आली असून सध्या तंबाखू चाकीच्या कामांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांच्या घरात सुरक्षितपणे पीक दाखल झाल्याने दिलासा मिळाला असला तरी आता सर्वांच्या नजरा बाजारभावाकडे लागल्या आहेत. यंदा …

Read More »

टेक्स्टाईल पार्कच्या जडणघडणीत शरद जंगटे यांचे योगदान महत्वपूर्ण

  कमिशनर टी.एच.एम.कुमार; अधिकाराकडून पाहणीवेळी निष्कर्ष निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्सटाईल पार्कबाबत अफवा आणि आरोपांची शहानिशा करून बोरगाव टेक्सटाईल पार्क म्हणजे कर्नाटक राज्यातील ऊर्जित अवस्थेत असलेला आणि सर्व उद्योग धंदे विकसित अन् सुरळीत सुरू असणारा एकमेव टेक्सटाईल पार्क असून यामध्ये शंका नाही. या उर्जित अवस्थेतील उद्योग व्यवसायांच्या जडणघडणीत बोरगाव …

Read More »