Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

बोरगाव औद्योगिक पार्कबाबत आरोप सिद्ध करूनच बोलावेत विनाकारण अफवा पसरवू नयेत; नगरसेवक शरदराव जंगटे यांचा इशारा

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथीलटेक्सटाईल पार्क औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेले सर्व उद्योगधंदे हे कर्नाटक राज्यातील व्यावसायिकांनाच मालकी तत्वावर दिले आहेत. ३९ पैकी २० उद्योजकांना शासकीय सवलतीचा लाभही मिळाला आहे. हेउद्योजक कर्नाटक राज्यातीलच आहेत. पण काही नागरिकांनी हा प्रकल्प, इतर राज्यातील उद्योजकांना दिल्याचे अफवा पसरण्याचा प्रयत्न करत आहेत. शक्य असेल …

Read More »

शहरातील रस्त्यावरील उघड्यावरील गटारींचा पादचाऱ्यासह वाहनधारकांना अपघाताचा धोका

  निपाणी (वार्ता) : शहरातील अनेक रस्त्यावरील गटारे तुटलेली, झाकणांशिवाय उघडी पडलेली असल्याने पादचाऱ्यासह वाहनधारकांना धोका होण्याची शक्यता आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या परिसरात तर अशा प्रकारचे अनेक उघड्या गटारी असल्याने नागरिकांसह ग्राहक आणि व्यापाऱ्यांना येजा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यावर …

Read More »

खानापूर आगाराला ‘शक्ती’ योजनेतून १.७२ कोटी : पंचहमी हमी योजना बैठकीत विविध योजनांचा आढावा

  खानापूर : तालुका पंचहमी हमी योजनांची मासिक बैठक शनिवारी (ता. ७) तालुका पंचायत सभागृहात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. यावेळी पंचहमी योजनांच्या विविध विभागीय अधिकाऱ्यांकडून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. शक्ती योजनेबाबत खानापूर आगाराचे नियंत्रक दुर्गाई यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात शक्ती योजनेंतर्गत ६,०६,६३२ …

Read More »

स्तवनिधीत हेमाडपंथी पाषाण मंदिरामध्ये सहस्त्रफणी पार्श्वनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ व स्थवनिधी येथील ब्रह्मचर्य आश्रम संचलित श्री पार्श्वनाथ ब्रम्हचार्याश्रम गुरुकुलमध्ये चैत्र कृष्ण पंचमीच्या मुहूर्तावर हेमाडपंथी पद्धतीने पाषाण नूतन मंदिर निर्माण होत आहे. दक्षिण भारतामध्ये कर्नाटकाच्या या प्रवेशद्वारावरती, तवंदी डोंगराच्या पायथ्याशी निर्माण होत असलेल्या या मंदिरामध्ये नूतन नयन मनोहर भगवान १००८ सहस्त्रफणी पार्श्वनाथ तीर्थंकरांची मूर्ती …

Read More »

सहकारी संस्थेत राजकारण करू नका : माजी खासदार रमेश कत्ती

  अकोळ विविधोद्देश ग्रामीण कृषी संघाच्या इमारतीचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशाला अन्न पुरवणारा शेतकरी आणि रक्षण करणाऱ्या सैनिकांचे प्रत्येकानी आदर केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवला पाहिजे. बाहेरचे लोक निपाणीत नको, त्यासाठी स्थानिक उमेदवारांची गरज आहे. शेतकऱ्यांना डिवचणाऱ्याना निवडणुकीत एका मताला एक लाख रुपये दिले तरी …

Read More »

निपाणीतील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले कर्नाटक राज्य पुरस्काराने सन्मानित

  निपाणी (वार्ता) : बेंगळुरू येथील अखिल कर्नाटक सांस्कृतिक परिषदतर्फे आयोजित साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागात पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे निपाणी येथील पर्यावरणप्रेमी शिक्षक‌ नामदेवराव चौगुले यांना कर्नाटक राज्य पुरस्कार पर्यावरणप्रेमी शिक्षक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.ज्ञानयोगी परमपूज्य श्री. सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या ज्ञानदासोहाच्या प्रेरणेने आयोजित करण्यात …

Read More »

आप्पाचीवाडी येथील पूल निर्मितीसाठीच ‘रयत’चा तहसील कार्यालयावर चाबूक मोर्चा

  निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील पुलाच्या कामासाठी २५ वर्षांपासून लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देत आहेत. पुलाच्या कामाचे अनेकदा उद्घाटन झाले. मात्र प्रत्यक्षात पुलाचे काम रखडल्याचा आरोप कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केला. रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली आप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांनी निपाणी तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी चाबूक मोर्चा काढून तहसीलदार मुंजे …

Read More »

‘फ्रिज’च्या जमान्यातही मातीच्या माठांना मागणी कायम

  निपाणी बाजारपेठेत अनेक ठिकाणी विक्री; चाव्यासह नानाविध प्रकारात उपलब्ध निपाणी (वार्ता) : यंदा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बदलत्या हवामानाने निपाणी शहर, उपनगरे आणि ग्रामीण भागांत तापमानवाढीची चाहूल लागली. ऊन, वारा आणि ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गर्मी वाढली आहे. आता मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढले आहे. त्यापासून गारवा मिळवण्यासाठी नागरिक थंड …

Read More »

खानापूर तालुक्यातील माचाळी येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; सुदैवाने प्राणहानी टळली

  खानापूर : खानापूर तालुक्यातील माचाळी येथे आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास गावातील नागरिक बाबल खंडेकर यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्यांना काही दुखापत झाली असली तरी सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, बाबल खंडेकर हे सकाळच्या वेळी जंगल परिसरात गेले असताना अचानक समोर आलेल्या अस्वलाने …

Read More »

आत्मविश्वासाने परीक्षा दिला तर यश नक्कीच मिळेल : सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रदीप काकडे

  बेळगाव : आजचे विद्यार्थी हे देशाचे आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संस्कारक्षमही झाले पाहिजेत, कारण संस्कारक्षम विद्यार्थी हेच देशाचे भूषण आहेत. विद्यार्थ्यांनी होऊ घातलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षेला गेलात तर नक्कीच यश मिळेल, असे विचार लातूर येथील सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रदीप काकडे यांनी व्यक्त केले. मनगुत्ती (ता.हुक्केरी) येथील …

Read More »