



दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी साधला संवाद; नेत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
खानापूर (वार्ता) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील आपल्या निवासस्थानी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते, बडे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
खानापूरच्या माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (एआयसीसी) सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनाही राहुल गांधी यांच्याकडून या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार डॉ. निंबाळकर यांनी दिल्ली येथे आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत सणाचा आनंद साजरा केला. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या या स्नेहमेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
Belgaum Varta Belgaum Varta