



बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित भाऊराव काकतकर पदवी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल वैशाली पंडित शिंदे यांना धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाकडून नुकताच पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.
ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयातून ‘लायब्ररी वेबसाईट ऑफ स्टेट युनिव्हर्सिटीज ऑफ इंडिया : अ वेबोमेट्रिक ॲनालिसिस’ हा प्रबंध श्रीमती शिंदे यांनी सादर केला होता.
कर्नाटक विद्यापीठाच्या पदव्युत्तर ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. गुरुराज. एस. हडगली यांनी त्यांना शोधप्रबंधासाठी मार्गदर्शन केले. तसेच दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील , संस्थेचे सचिव विक्रम पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. शिंदे यांचे मार्गदर्शन वैशाली शिंदे यांना लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील लौकिकात भर टाकली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta