Saturday , November 7 2026
Breaking News

बेळगावात मटका जुगार अड्ड्यावर सीसीबीचा छापा; दोघांना अटक!

Spread the love

 

२८ हजार ८४० रुपयांची रोकड जप्त; माळमारुती पोलिसांत गुन्हा दाखल

बेळगाव : शहरात सुरू असलेल्या अवैध मटका जुगाराला आळा घालण्यासाठी सीसीबी पोलिसांनी कारवाई करत मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २८ हजार ८४० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे प्रकाश पीराजी हुलकोत्ले (वय ३१, रा. लक्ष्मी गल्ली, मुचंडी, ता. बेळगाव) आणि रोहित अर्जुन मुरारी (वय २२, रा. लक्ष्मी गल्ली, सुळेभावी) अशी आहेत.

मटका जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सीसीबी पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील २८ हजार ८४० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध मटका जुगाराच्या व्यवहाराबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

हणमशेठ स्वीटचे ज्येष्ठ संचालक जयंत हणमशेठ यांचे निधन

Spread the love  बेळगाव : बेळगावातील प्रसिद्ध हणमशेठ स्वीटचे ज्येष्ठ संचालक आणि उद्योजक जयंत विष्णुपंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *