



बेळगाव : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा २ ते ११ डिसेंबर या कालावधीत बेळगाव येथे होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्रक विधानसभेच्या सचिवांकडून जारी करण्यात आले आहे.
यापूर्वी ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत दहा दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, हिरियूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या नियोजित तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता २ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होणार असून, ११ डिसेंबरपर्यंत कामकाज चालणार आहे.
या अधिवेशनासाठी बेळगावमधील सुवर्ण विधानसौध येथे प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांकडून तयारी केली जाण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta