



बेळगाव : बेळगावातील प्रसिद्ध हणमशेठ स्वीटचे ज्येष्ठ संचालक आणि उद्योजक जयंत विष्णुपंत हणमशेठ (वय ७५) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने बेळगावच्या व्यापारी आणि उद्योजक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठा कॉलनी येथील रहिवासी असलेले जयंत हणमशेठ हे मेणसे गल्लीतील प्रसिद्ध हणमशेठ स्वीटचे ज्येष्ठ संचालक होते. त्यांनी वंशपरंपरागत मिठाई व्यवसायाची धुरा समर्थपणे सांभाळत हा व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेला. काळानुरूप व्यवसायाचा विस्तार करत हणमशेठ या ब्रँडला ग्राहकांच्या मनात विशेष प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
व्यवसायातील प्रामाणिकपणा, सातत्य आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी उद्योगक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. त्यांच्या निधनाने हणमशेठ कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि व्यापारी क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta