Saturday , November 7 2026
Breaking News

लोखंडी रॉडने हल्ला केल्याच्या आरोपातून सावगावातील एकाची निर्दोष मुक्तता!

Spread the love

 

साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगतीमुळे न्यायालयाचा निर्णय

बेळगाव : लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून सावगाव येथील शाम खाचू सावगावकर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. साक्षीदारांच्या जबाबांमध्ये आढळलेल्या विसंगतींचा विचार करून दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयाने हा निकाल दिला.

या प्रकरणातील फिर्यादी दशरथ कल्लाप्पा कदम (रा. लक्ष्मी गल्ली, सावगाव) यांच्यावर २४ नोव्हेंबर २०१५ रोजी हल्ला झाल्याचा आरोप होता. दशरथ हे दुपारी शेतातून मोटारसायकलवरून गवताचा भारा घेऊन घरी परतत असताना त्यांच्या मोटारसायकलचा धक्का लागून रस्त्याच्या कडेला उभी असलेली हिरोहोंडा स्प्लेंडर खाली पडली होती.

यानंतर दशरथ हे घरी जाऊन जनावरांना गवत घालत असताना शाम सावगावकर तेथे आले. मोटारसायकल पाडल्याच्या कारणावरून वाद घालत त्यांनी लोखंडी रॉडने दशरथ यांच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद होते.

या हल्ल्यात जखमी झालेल्या दशरथ यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे तीन मुद्देमाल आणि दहा साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्याने न्यायालयाने संशयित शाम खाचू सावगावकर यांची निर्दोष मुक्तता केली. बचाव पक्षातर्फे ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *