Sunday , September 20 2026
Breaking News

मणतुर्गा येथे दुकान फोडून चोरी; २० हजाराचा मुद्देमाल लंपास

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा–हेमाडगा रस्त्यालगत असलेल्या एका पान टपरी दुकानात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे १५ ते २० हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम भरमानी देवलतकर यांनी उपजीविकेसाठी रस्त्यालगत छोटासा दुकानाचा खोका उभारला होता. या दुकानात चॉकलेट, बिस्कीट, सिगारेट, गुटखा यांसह ग्राहकांच्या मागणीनुसार चहा बनवून दिला जात होता. या छोट्या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता.

दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सिगारेटची पाकिटे, गुटखा, चॉकलेट, इतर किरकोळ साहित्य तसेच चहा बनवण्यासाठी ठेवलेली सुमारे दोन किलो वजनाची लहान गॅस शेगडी चोरून नेण्यात आली.

सकाळी दुकान उघडण्यासाठी गेल्यावर कुलूप तुटलेले दिसताच देवलतकर यांच्या निदर्शनास ही बाब आली. या चोरीमुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असून, त्यांनी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *