Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

केवायसी नसल्यास गॅस कनेक्शन बंद

  वितरक गजेंद्र तारळे यांची माहिती निपाणी (वार्ता) : गॅस कनेक्शन धारकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र केवायसीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. अनेकांची केवायसी रखडल्याने डाटा अपडेट करताना अडचणी येत आहेत. केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन आणि सबसिडी बंद होणार‌ असल्याची माहिती येथील गॅस वितरक गजेंद्र तारळे यांनी …

Read More »

मुसळधार पावसाचा अंदाज; बेळगावसह विविध ठिकाणी यलो अलर्ट जाहीर

  बंगळुरू : राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तरा कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, बेळगाव, धारवाड, गदग आणि कोप्पळ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार पावसामुळे हावेरी, शिमोगा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट …

Read More »

निपाणीतील मताधिक्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून समाधान

  निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी या विजयी झाल्या. त्यांना निपाणी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे बेंगळूर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काकासाहेब पाटील यांचे अभिनंदन केले. शिवाय कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. निवडणुकीच्या काळात निपाणी मतदार संघात सर्वांनी एकजूटपणे काम काम केले आहे. शिवाय …

Read More »

प्रत्येकांनी पर्यावरणाचे संरक्षण करावे

  प्राचार्या स्नेहा घाटगे : जागतिक पर्यावरण दिन निपाणी (वार्ता) : भारतीय संस्कृती समृद्ध असून ती वेगवेगळ्या सणांनी नटलेली आहे. प्रत्येक सणामागील हेतू हा पर्यावरण पूरक आहे. त्या सणाचे महत्त्व समजून घेऊन प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करावे, असे आवाहन प्राचार्या स्नेहा घाटगे यांनी केले. बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न स्कूलमध्ये …

Read More »

राष्ट्रीय विज्ञान कार्यशाळेसाठी नदाफ, शेवाळे यांची निवड

  निपाणी (वार्ता) : शैक्षणिक कार्यासाठी कार्यरत असलेल्या भोपाळ येथील एकलव्य फाउंडेशनतर्फे देशभरातील विज्ञान शिक्षकासाठी विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान शिक्षकांचे मूलभूत ज्ञान व प्रायोगिक कौशल्यामध्ये वाढ करण्याच्या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. सोमवार (ता.१०) ते शनिवार पर्यंत (ता.१५) भोपाळ येथे होणाऱ्या कार्यशाळेसाठी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातून भोज …

Read More »

‘वाल्मिकी’ घोटाळा प्रकरणी कोणत्याही चौकशीला तयार

  मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील; पुरावे नष्ट केल्याचा आरोप बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळ मंडळाचे पुरावे नष्ट करण्याबाबत कोणाशीही बैठक झाली असेल तर खुल्या व निष्पक्ष चौकशीसाठी तयार आहोत, असे खुले आव्हान वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी दिले आहे. शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाल्मिकी विकास महामंडळ प्रकरणात चौकशी होत …

Read More »

उच्च न्यायालयाची एसआयटीला नोटीस

  एच. डी. रेवण्णांची गुन्हा रद्द करण्याची मागणी बंगळूर : आमदार एच. डी. रेवण्णा यांनी हसन जिल्ह्यातील होळेनरसीपूर शहर ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला लैंगिक अत्याचाराचा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाला (एसआयटी) नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या एकल सदस्यीय खंडपीठाने …

Read More »

कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज; 5 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर

  बंगळुरू : कर्नाटक राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीतही झाले आहे. दरम्यान, 13 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. किनारपट्टी लगतचे जिल्हे आणि अनेक उत्तरेकडील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये आज आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उडुपीसह 5 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात …

Read More »

४० टक्के कमिशनचा आरोप; काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सशर्त जामीन

  बंगळूर : मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रांमध्ये “बदनामीकारक” जाहिराती दिल्याबद्दल भाजपच्या कर्नाटक शाखेने दाखल केलेल्या खटल्याच्या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शुक्रवारी येथील विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या जाहिरातीत तत्कालीन भाजप सरकारवर २०१९-२०२३ च्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Read More »

शहरा ऐवजी बाहेर हेल्मेट सक्ती करा : प्रा. राजन चिकोडे

  दुचाकीवर मोबाईल वरील संभाषणास बंदी घाला निपाणी (वार्ता) : दोन दिवसापासून प्रादेशिक वाहतूक खाते आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने दुचाकीस्वरांना हेल्मेट सक्ती केली आहे. ती योग्य आहे. पण शहरातील व्यक्ती किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकानात खरेदीसाठी बाजार पेठेत फिरत जात असेल तर हेल्मेट वापरणे गैरसोयीचे होते. त्यासाठी शहरा बाहेर ये-जा करणाऱ्या …

Read More »