Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

राज्यसभा निवडणूक : राज्यात कॉंग्रेसला तीन, भाजपला एक जागा

  धजद उमेदवाराचा अपेक्षित पराभव बंगळूर : राज्यसभेच्या चार जागांसाठी राज्य विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी काँग्रेसचे तीन आणि भाजपच्या एका उमेदवाराची निवड झाली असून धजद उमेदवार पराभूत झाला आहे. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून विधानसभा सचिव एम. के. विशालाक्षी, जे राज्यसभा निवडणूक …

Read More »

बोरगाव येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील माळी गल्लीतील महादेव मंदिरात शुक्रवार (ता.१) ते शनिवार (ता.९) अखेर महाशिवरात्री उत्सव सोहळा व सत्संग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महादेव मंदिर कमिटी, बसवेश्वर क्रीडा युवक मंडळ, बसव ग्रुप, आक्कमहादेवी अक्कन बळग यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजन कमिटी कडून …

Read More »

निपाणी आमराईमधील रेणुका यात्रेस भाविकांची गर्दी

  निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यामधील जग व पालखी सौंदत्ती यल्लम्मा डोंगरास जाऊन आली. त्यानिमित्त येथील आमराई मध्ये रेणुका यात्रा भरली होती. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी (ता.२५) सकाळी रेणुका मंदिरामध्ये श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते रेणुका मातेला …

Read More »

कुंभार कुटुंब पत्रिका भरण्याचे आवाहन : शिवस्मारकात कुंभार समाजाची बैठक संपन्न

  खानापूर : दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ सदस्य व समन्वयकांची बैठक रविवार (दि.25) रोजी शिवस्मारक येथे दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभ दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे सचिव परशराम पालकर यांनी प्रास्ताविकेत गतबैठकीचा आढावा घेत …

Read More »

शिक्षणासह आरोग्य सेवेला महत्व

  डॉ. प्रभाकर कोरे; निपाणीत महाआरोग्य शिबिर निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण सेवा देण्याच्या उद्देशाने केएलई संस्थेची स्थापना केली. त्यापाठोपाठ सेवा हा दृष्टिकोन ठेवून हॉस्पिटलची उभारणी केली. त्याच्या माध्यमातून हजारो रुग्णावर विविध प्रकारचे उपचार केले जात आहेत. लवकरच आयुर्वेदिक उपचार सेवा ही सुरू होणार असल्याचे केएलई संस्थेचे संस्थापक …

Read More »

विद्यार्थ्यांनी लिहिले आईवडीलांना पत्र; ‘नूतन’ मराठी विद्यालयात अनोखा उपक्रम

  निपाणी (वार्ता) : फेसबुक, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, व्हिडीओ कॉलिंगच्या जमान्यात आपली मुले जेव्हा आपल्या पालकांना पत्र लिहितात तेव्हा तो कुठल्याही पालकांसाठी सुखद आठवणीचा साठाच असतो. येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयातील प्राथमिक विभागाच्या पाल्यांनी देखील स्वतःच्या पालकांना उद्देशून पोस्ट कार्ड लिहिली. यावेळी विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफीस, विविध …

Read More »

बेळगाव – चोर्ला – गोवा महामार्ग दुरुस्तीला प्रारंभ

  मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते उद्घाटन खानापूर : बेळगाव आणि गोवा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या बेळगाव-चोर्ला-गोवा सीमेपर्यंतच्या राज्य महामार्ग ७४८ -अ च्या दुरुस्तीला आज सुरुवात झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते कणकुंबी (ता. खानापूर) येथे या दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यात आले. या ४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या …

Read More »

निपाणीतील बौद्ध धम्म परिषदेची तयारी पूर्ण

  सुधाकर माने यांची माहिती; दोन सत्रात होणार कार्यक्रम निपाणी (वार्ता) : निपाणी येथे रविवारी (ता.२५) अकोळ रोड वरील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवन समोर दोन सत्रात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुधाकर माने यांनी दिली. माने म्हणाले, धम्म परिषदेच्या …

Read More »

बोरगावमध्ये कीर्तीस्तंभाचे लोकार्पण; सोहळ्यानिमित्त ११० मुलांचे मौजीबंधन

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील महावीर सर्कल येथे काही महिन्यांपासून उभारण्यात येत असलेल्या कीर्तीस्तंभाचे लोकार्पण सोहळा पार पडला. संस्कार शिरोमणी आचार्य रत्न श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज व १०८ श्री उत्तमसागर मुनी महाराज, यजमान धर्मानुरागी, सहकाररत्न उत्तम पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा …

Read More »

कर्नाटक सीमा आयोगाची 15 मार्च रोजी बैठक

  बेळगाव : महाराष्ट्र सरकारने सीमा बांधवांसाठी शिनोळी येथे विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कर्नाटक सरकारला सणसणीत चपराक बसली आहे. आता कर्नाटकच्या राज्य भूमी आणि सीमा संरक्षण आयोगाने येत्या 15 मार्च रोजी बेळगाव येथे बैठक घेण्याचा निर्णय घेतला असून बैठकीत महाराष्ट्राला रोखण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. राज्य भूमी आणि …

Read More »