खानापूर : खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी गावात काल रात्री एका किरकोळ मुद्द्यावरून दोन गटात हाणामारी झाली. रात्री घडलेल्या घटनेप्रमाणेच आज सकाळीही दोन गटात हाणामारी झाली. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तोपिनकट्टी गावात जाऊन सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांनीही तोपिनकट्टी गावात तळ ठोकला होता. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. एकूणच …
Read More »विद्युत रोषणाई, मूर्तीच्या भव्यतेवर भर
निपाणी परिसरातील चित्र; गणेशोत्सव देखाव्यांची परंपरा दुर्मिळ निपाणी (वार्ता) : सळसळत्या उत्साहाचे प्रतीक मानाला जाणारा गणेशोत्सव सुरू झाला आहे. अनेक परंपरा असणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पूर्वी सजीव देखावे सादर करून प्रबोधन करत होते. पण गेल्या काही वर्षापासून त्याऐवजी आकर्षक विद्युत रोषणाई, गणेश मूर्ती आणि महाप्रसादावर भर दिला जात असल्याचे …
Read More »शहरासह ग्रामीण भागात गौरी गीतांची धूम
ज्येष्ठा गौरी पूजनानंतर गाण्यांचा फेर; आधुनिक युगातही गौरी गीतावर भर निपाणी (वार्ता) : नागपंचमी, गौरी-गणेश हे प्रामुख्याने महिलांचे सण म्हणून साजरे केले जातात. गौरी सणासाठी सासूरवासिनी माहेरी दाखल झाल्या आहेत. त्यानिमित्ताने निपाणी शहर व ग्रामीण भागात झिम्मा फुगडीसह गौरीगीतांचा माहोल दिसत आहे. काळाच्या ओघात गौरी-गणेशाची गाणी दुर्मीळ होत चालली …
Read More »कावेरीचे तामिळनाडूला पाणी सोडण्याचा ‘सर्वोच्च’ आदेश; कर्नाटकाला मोठा धक्का
बंगळूर : तामिळनाडूला पुढील १५ दिवस दररोज पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याच्या कावेरी जलव्यवस्थापन समितीच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन, कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाने कर्नाटकला धक्का बसला आहे. आता कायदेशीर लढाईतही …
Read More »खानापूर तालुका समितीच्या वतीने मान्यवरांचा 24 रोजी सत्कार
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगांव जिल्हा आदर्श शिक्षक व निमलष्करी दलात नियुक्त झालेल्या खानापूर तालुक्यातील मराठी तरुणींचा तसेच चांद्रयान-३ २०२३ या मोहिमेत यशस्वी झालेल्या इस्रोचे कनिष्ठ शास्त्रज्ञ श्री. प्रकाश पेडणेकर यांचा सत्कार करण्याचे आयोजिले आहे. खानापूर तालुक्यातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे खालीलप्रमाणे आहेत. …
Read More »माध्यमिक शाळा नोकर संस्थेला 6.94 लाखाचा नफा
लक्ष्मणराव चिंगळे; माध्यमिक नोकर पतसंस्थेची सभा निपाणी (वार्ता) : निस्वार्थी संचालक मंडळ आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे संस्थेची प्रगती होत आहे. त्यासाठी सभासदांनी जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार करावेत. येत्या आर्थिक वर्षात 2 कोटी रुपये इतक्या ठेवींचे उद्दिष्ट असल्याचे संस्थेचे संस्थापक लक्ष्मणराव चिंगळे यांनी सांगितले. येथील माध्यमिक शाळा नोकर व निवृत्त नोकर …
Read More »महिला आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय
आमदार शशिकला जोल्ले; आरक्षणामुळे निपाणीत आनंदोत्सव निपाणी (वार्ता) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण जाहीर करून महिला सबलीकरणाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात सर्वप्रथम समाजात समानता आणण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्याच रूपात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला …
Read More »कायदेशीर दस्तऐवजानुसार समाजाला न्याय मिळावा
श्रीनिवास चोपडे ; ख्रिस्ती समाज जागेची बेकायदेशीर विक्री निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अक्कोळ क्रॉस नजिकच्या ख्रिश्चन समाजाची १३१ /बी या जागेची काही लोकांनी बेकायदेशीर आणि कागदोपत्रांची पडताळणी न करता विक्री केली आहे. सदरची जागाही कोईमारची असून ती कोल्हापूर चर्च कौन्सिलला लिजवर दिले आहे. येथे विद्यार्थ्यांचे वस्तीगृह आणि ज्ञानदान …
Read More »गौरीच्या हारांची जोडी तब्बल १२०० रुपये!
दरवाढीमुळे भाविकांच्या खिशाला खात्री : फुलांची आवक मंदावली निपाणी(वार्ता) : गणेशोत्सवा पाठोपाठ गुरुवारी (ता.२१) जेष्ठा गौरींचे (महालक्ष्मी) आगमन झाले आहे. त्यामुळे निपाणी बाजारात फुलांची मागणी वाढली असून आवक कमी असल्याने भाव वाढले आहेत. परिणामी गौरीच्या फुलांच्या हारांच्या जोडीचे दरही वधारले असून १२०० रुपयापर्यंत गेले आहेत. गेल्या चार ते पाच …
Read More »कुर्लीतील झिम्मा फुगडी स्पर्धेत सोनाळीचा संघ प्रथम
निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील एचजेसी चिफ फौंडेशनच्या वतीने गणेशोत्सव निमित्त झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन उदघाटन कागल तालुका शिवसेना महिला आघाडी प्रमुख रुपाली पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कमल चौगुले या होत्या. स्पर्धेमध्ये सोनाळी येथील नागनाथ महिला मंचने प्रथम क्रमांक पटकावला. एस. एस. चौगुले यांनी, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta