Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

उमेदवारी फसवणूक प्रकरण; चैत्रा टोळीकडून रोख रकमेसह ३.८ कोटींचे सोने जप्त

  बंगळूर : भाजपची उमेदवारी देण्याचे अमिष दाखवून व्यापारी गोविंद पुजारी यांची फसवणूक करणाऱ्या चैत्रा कुंदापूर टोळीकडून सीसीबी पोलिसांनी रोख रक्कमेसह ३.८ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. १२ सप्टेंबर रोजी, चैत्र कुंदापुर टोळीला उडुपी आणि चिक्कमंगळूर येथे अटक करण्यात आली, त्यांना न्यायालयात हजर केले गेले आणि सीसीबी पोलिसांनी पुन्हा …

Read More »

खानापूरातील बकरी बाजारात करोडो रुपयांची उलाढाल

  खानापूर : गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात उत्साहाने साजरा करण्यात येणारा सण म्हणजे उंदरी. गणपतीचे वाहन असणाऱ्या उंदराला गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मांसाहार नैवद्य दाखविण्याची प्रथा काही भागात आहे. यानिमित्ताने आज रविवारी 17 सप्टेंबर रोजी खानापूरच्या आठवडी बाजारात बकरी बाजार भरला होता. बकरी बाजारात यावर्षी करोडो रुपयांची उलाढाल …

Read More »

सजावट साहित्य खरेदीसाठी “सुपर संडे”

  गणेशोत्सव केवळ एक दिवसावर; निपाणीत खरेदीसाठी गर्दी निपाणी (वार्ता) : विघ्नहर्ता गणेशाचे आगमन अवघ्या १ दिवसावर येऊन ठेपले आहे. या आगमनाच्या पार्श्वभूमीवर निपाणी बाजारपेठेत सजावट साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रविवारी (ता.१७) सुट्टीच्या दिवशी गर्दी झाली होती. त्यामुळे रविवार हा खरेदीसाठी सुपर संडे ठरला. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठवड्यापासून विविध नमुन्यातील …

Read More »

कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या कार्याध्यक्षपदी राजू पोवार यांची निवड

  निपाणी (वार्ता) : बंगळुर येथील फ्रीडम पार्क मध्ये कर्नाटक राज्य रयत संघटनेची बैठक रविवारी (ता.१७) पार पडली. त्यामध्ये येथील राजू पोवार यांची कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी चिकोडी जिल्हा अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवल्या होत्या. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य …

Read More »

होन्नावरजवळील टोंका समुद्रकिनाऱ्यावर आढळला दीड टन वजनाचा मृत व्हेल मासा!

  खानापूर : होन्नावरजवळील कासरकोड येथील टोंका बिचवर आज (रविवार) सकाळी तब्बल दीड टन वजनाचा व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वनविभाग आणि पशु संगोपन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची शवचिकित्सा करून मृत्यूच्या कारणाचा शोध सुरू केला आहे. स्वच्छ आणि निसर्गरम्य इको बीच म्हणून टोंका …

Read More »

दांडेली येथील एका खाजगी शाळेत मुलींचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न?

  दांडेली : उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील एका खाजगी शाळेत विद्यार्थिनींच्या गटाने एकत्रितपणे हाताची नस कापून घेऊन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. 9वी आणि 10वीत शिकणाऱ्या 9 विद्यार्थिनींच्या डाव्या हाताच्या खालच्या भागात धारदार शास्त्राने जखम झाल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांच्या हातावर 10-15 जखमा आढळून आल्या. त्या …

Read More »

श्री अरिहंत क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेट संस्थेची निवडणूक बिनविरोध

  निपाणी (वार्ता) : येथील अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेला मल्टीस्टेट संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्यानुसार या संस्थेची निवडणूक घेण्यात आली. संस्थेचे कार्य पाहून सर्वांच्या मते ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष सहकारत्न रावसाहेब पाटील, उपाध्यक्षपदी खडकलात येथील सतीश पाटील यांची निवड करण्यात आली. तर संचालक पदी युवा …

Read More »

अरिहंत मल्टीस्टेट संस्थेला 9.72 कोटीचा नफा

  उत्तम पाटील; अरिहंत क्रेडिट मल्टीस्टेटची वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत संस्थेला मल्टीस्टेटचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात संस्थेचा विस्तार होणार आहे. त्याच्या माध्यमातून सर्वांचे जीवनमान उंचावणार आहे. यंदा सर्वांच्या सहकार्याने संस्थेला आर्थिक वर्षात 9 कोटी 72 लाखावर नफा झाल्याची माहिती बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील …

Read More »

आयशरची ट्रकला धडक; एक ठार, चार जखमी

  खानापूर : नायकोल कत्री जवळ रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दहा चाकी लॉरीला पाठीमागून आयशर ट्रकने जोराची धडक दिल्याने संगरगाळी गावचे नागरिक नारायण लक्ष्मण कडोलकर (वय 65) यांचा पाय निकामी झाल्याने अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत समजलेली माहिती अशी की, माडीगुंजीहून खानापूरकडे येत असलेल्या आयशर ट्रकने नायकोल कत्री जवळ रस्त्याच्या बाजूला …

Read More »

दोड्डबळ्ळापूर येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू

  बेंगळुरू : बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील दोड्डबळ्ळापूर तालुक्यातील होलेयरहळ्ळी येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. काळे सरेरा (60), लक्ष्मी सरेरा (50), उषा सरेरा (40), पॉल सरेरा (16) यांचा मृत्यू झाला. नेपाळी वंशाचे एक कुटुंब नोकरीच्या शोधात 8 दिवसांपूर्वी दोड्डबळ्ळापूर येथे स्थायिक झाले होते. जे रात्री कॉलीफॉर्ममध्ये …

Read More »