खानापूर : खानापूर तालुक्यातील गोल्याळी वन विभागाअंतर्गत आवरोळी गावाच्या हद्दीत वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोमनिंग रवळप्पा कुडोळी (वय 50) व प्रभू सध्दाप्पा कुडोळी (वय 38) यांना अटक करून या दोघांची रवानगी कारागृहात करण्यात आली. बेळगाव विभाग उपवन संरक्षण अधिकारी कल्लोळकर तसेच नागरगाळी उपविभाग सहाय्यक …
Read More »खानापूर तालुक्यात शिक्षकांच्या बदलीचा परिणाम; विद्यार्थी गेले बाहेर, स्वयंपाकीला केले कमी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ विस्ताराने मोठे त्यातच जंगलाने व्यापलेला तालुका असल्याने नुकताच खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळातील शिक्षकांच्या तालुका बाहेर व अतंर्गत तालुक्यात झालेल्या बदल्यामुळे तालुक्यातील जवळपास ३० शाळातून कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने पालकांनी विद्यार्थ्याचे भवितव्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना दुसरीकडे हलविण्याने विद्यार्थ्याची संख्या कमी …
Read More »शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने अनुदान उपलब्ध करावे : खानापूर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील अनेक मराठी शाळांच्या इमारतींची पडझड झाली आहे. त्यामुळे विद्यार्थांना त्रास सहन करावा लागत असल्याने त्यामुळे शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी तातडीने अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आली आहे. तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पावसाने नुकसान झालेल्या विविध शाळांची पाहणी केली तसेच …
Read More »लोकसभा निवडणुकीचे वारे; कॅनरा लोकसभेसाठी प्रमोद कोचेरी इच्छुक
खानापूर (प्रतिनिधी) : येत्या नविन वर्षात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहणार तेव्हा कॅनरा लोकसभा मतदारसंघातून भाजप व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारातून हालचालीना सुरूवात झाली आहे. कॅनरा लोकसभा मतदारसंघात खानापूर हा मराठी भाषिक मतदार संघ समाविष्ट केला आहे. खानापूर तालुक्यातून भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी हे कॅनरा लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छूक असल्याची चर्चा …
Read More »क्रांतीकारकांचे योगदान भारतीय इतिहासात अमूल्य ठेवा
प्रा. डॉ. सिकंदर शिदलाळे : क्रांती दिनानिमित्त कार्यक्रम निपाणी (वार्ता) : भारताला इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी भारतीय क्रांतिकारकांनी सर्वस्व बलिदान दिले. भारत मातेला बलिदानाशिवाय मुक्त करता येणार नाही, त्यासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून देऊन भारताला सोनेरी दिवस देण्याचे काम सशस्त्र क्रांतिकारकांनी केले. त्यामुळे क्रांतिकारकांचे …
Read More »पीओपी मूर्तींना यंदा शहराबाहेर थांबा?
पर्यावरण पूरक मूर्तींचा आग्रह; नगरपालिका अलर्ट मोडवर निपाणी (वार्ता) : गणेश उत्सव काही महिन्यांवर असताना नगरपालिका यंदा प्लास्टर ऑफ पारस (पीओपी) मूर्तीच्या आयाती संदर्भात अलर्ट झाली आहे. पीओपी मूर्ती शहरात येणार नाहीत, याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे शहरामध्ये दाखल होणाऱ्या मूर्तीची संख्या यंदा घटण्याची शक्यता आहे. शिवाय माती …
Read More »निपाणी तालुक्यात तालुका प्रशासनाकडून नुकसानग्रस्त घरांचा सर्व्हे : तहसीलदारांकडून पाहणी
निपाणी (वार्ता) : गेल्या महिन्यात 15 जुलैनंतर पावसाचा जोर वाढला. परिणामी तालुक्यातील बहुतांशी बंधारे पाण्याखाली गेले होते. सध्या सर्व बंधाऱ्यांवरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. पाऊसही थांबल्याने तालुका प्रशासनातर्फे नुकसानग्रस्त घरांची पाहणी करण्यात आली आहे. त्यानुसार ए आणि बी प्रकारात घराचे नुकसान झाले असल्यास त्यांना पाच लाख रुपये भरपाई देण्यात …
Read More »खानापूर तालुक्याला प्राथमिक शाळा शिक्षक बदलीचा फटका बसणार
खानापूर (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच प्राथमिक शाळा शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पार पडली. याचा सर्वात जास्त फटका खानापूर तालुक्यातील शाळांना होणार आहे. कारण खानापूर तालुका हा अतिदुर्गम व जंगलाने व्यापलेला आहे. अशा तालुक्यातील गावांना वाहतुकीची सोय नाही. तसेच जंगल भागातील गावांना सुविधा नाहीत. अशा दुर्गम भागातील शाळांना जाणाऱ्या …
Read More »लोंढा विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धा संपन्न
खानापूर : गुंजी (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर लोंढा विभागीय माध्यमिक विद्यालय क्रीडा स्पर्धा मंगळवारी दि ८ रोजी संपन्न झाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजी हायस्कूलचे एसडीएमसी अध्यक्ष मारूती जाधव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष गुरव, उपाध्यक्ष अमोल बेळगावकर, पीकेपीएस सोसायटीचे संचालक हरिहर …
Read More »मंगसुळीत राष्ट्रीयीकृत बँकेची मागणी
कागवाड : मंगसुळी येथे कर्नाटक विकास ग्रामीण बँक ही एकमेव बँक असून येथील सर्व आर्थिक व्यवहार याच बँकेमध्ये चालतात. सदर बँकही अपुल्या जागेत असून बँकेत कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहाराला अडचण होत आहे. यासाठी प्रत्येक विभागाचे वेगवेगळे काऊंटर करून कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta