Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

कर्नाटकात दुष्काळ, पूरव्यवस्थापनासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

  बंगळूर : राज्यात दुष्काळ आणि पूर व्यवस्थापनासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात यावी, असा आदेश राज्य सरकारने दिला होता. त्याप्रमाणे महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत पाटबंधारे खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री प्रियांक खर्गे, कृषिमंत्री चलुवरायस्वामी, खाण व फलोत्पादन मंत्री …

Read More »

अविरत कष्ट, प्रामाणिकपणा हेच यशस्वी व्यवसायाचे गुपित

  रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला; चिपरी फाटा येथे हॉटेल शुभारंभ निपाणी (वार्ता) : कष्ट हे मानवी जीवनाच्या प्रगतीचे मुख्य माध्यम आहे. पण कष्टाला शास्त्राची आणि अध्यात्माची जोड असेल तर प्रगतीची गती अधिक वेगवान होते. कोणत्याही व्यवसायात माणसाने प्रामाणिकपणे सेवा दिली तर त्या व्यवसायाचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात होण्यास मदत होते, त्यामुळे …

Read More »

खानापूर आंबेडकर भवनाचा मुद्दा परिशिष्ट जाती जमातीच्या बैठकीत गाजला

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील आंबेडकर भवन उभारणीसाठी परिशिष्ट जाती, जमातीच्या नागरिकांकडून गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र खानापूर तालुका अधिकाऱ्यांकडून गेल्या चार वर्षांत याची कोणतीच हालचाल झाली नाही, अशी तक्रार राजू खातेदार यांनी गुरूवारी दि. २२ रोजी रेल्वे स्टेशन रोड वरील समुदाय भवनात आयोजित परिशिष्ट जाती, जमातीच्या बैठकीत …

Read More »

रिक्षा व्यवसायिकांच्या विविध मागण्याबाबतचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : रिक्षा व्यवसायिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष करत आहेत. परंतु छोट्या-छोट्या मागण्यांकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचे जगणे कठीण झाले आहे, त्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन मागण्यांचे पूर्तता करावी या मागणीचे निवेदन तहसीलदारामार्फत निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक -मालक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना तहसीलदार …

Read More »

समाजासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य उपयुक्त : प्राचार्य डॉ. महांतेश हुरळी

  यरनाळमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागून जीवनात त्याचा पाया घातला जातो. या शिबिरातून विद्यार्थ्यांना घडविण्यासह समाजाचा विकास करता येतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्य करणे आवश्यक आहे, असे मत येथील जीआय बागेवाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महांतेश हुरळी यांनी व्यक्त …

Read More »

निपाणीच्या पाणीप्रश्नी जिल्हाधिकारी शुक्रवारी निपाणीत

  काकासाहेब पाटील; नागरिकांनी उपस्थित राहावे निपाणी(वार्ता) : गेल्या काही दिवसापासून निपाणी शहर आणि उपनगरातील पाणी प्रश्न गंभीर बनला याबाबत बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांशी आपण चर्चा करून तोडगा काढण्यासाठी सूचना केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी नितेश पाटील हे शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी चार वाजता येथील नगरपालिका कार्यालय सभागृहात उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांनी उपस्थित …

Read More »

वाळलेल्या उसाचा सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळावी

  रयत संघटनेची मागणी; तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात यावर्षी एकही वळीवाच पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाय तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उसाचे पीक घेतले असताना पावसा अभावी हे पीक पूर्णपणे वाळून गेले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे. शासनाने तात्काळ वाळलेला …

Read More »

‘अरिहंत’तर्फे सृष्टी खोत हिचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : अंमलझरी येथील सृष्टी सुरेश खोत हिने दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल युथ गेम्स चॅम्पियन शिपमध्ये सिल्वर मेडल मिळविले आहे. त्यानिमित्त तिचा बोरगाव पिके पीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील व अरिहंत बँकेचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक कौशल्ये …

Read More »

अस्वलाच्या हल्ल्यात जखमी चंदगडचा इसम जखमी

  रामनगर : चंदगड तालुक्यातील एक इसम रामनगर नजीक आपले नातेवाईकाच्या घरी तिंबोली येथे पायी चालत जात असताना रायशेत दरम्यान अचानक अस्वलाने हल्ला केल्याने एक इसम गंभीर झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. जखमी झालेल्या इसमाचे नाव विष्णू तानाजी शेळके वय 72 राहणार मावळणगी, चंदगड जिल्हा कोल्हापूर असे आहे. याबाबत मिळालेली …

Read More »

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये तीन दिवसीय ध्यानधारणा शिबिर उत्साहात

  निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये हार्ट फुलनेस ऑर्गनायझेशन तर्फे तीन दिवसीय ध्यानधारणा प्रशिक्षण शिबिर पार पडले. अध्यक्षस्थानी प्राचार्या स्नेहा घाटगे होत्या. प्रारंभी लीलावती मेनसे यांनी स्वागत केले. प्राचार्या घाटगे यांनी ध्यानधारणेचे महत्त्व स्पष्ट केले. ऋतुजा देसाई यांनी, प्रत्येक व्यक्तीला दुःखमुक्त, पीडामुक्त, आजारमुक्त स्वस्थ …

Read More »