खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड गावात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवार आ. डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांच्यासाठी जाहीर प्रचार सभा घेतली. खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ. निंबाळकर यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. जाहीर सभेत अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाच …
Read More »निपाणी मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी निवडून द्या
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार राजू पोवार : शिवापूरवाडी, गजबरवाडी परिसरात प्रचार निपाणी (वार्ता) : आपल्याकडे कोणत्याही प्रकारची राजकीय सत्ता नसताना केवळ रयत संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. पण राज्यकर्ते बऱ्याच वेळा आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात …
Read More »विकासाच्या मुद्द्यावर गाजणार निपाणीची निवडणूक
युवक, महिलांची मते निर्णायक ; मातब्बर उमेदवार रिंगणात निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मतदार संघाच्या यादीतील पहिला आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर निपाणी मतदारसंघ आहे. मतदारसंघात जवळपास ९० टक्के मराठी भाषिक नागरिक आहेत. येथे प्रथमच तब्बल १० उमेदवार निवडणूक रिंगणात विधानसभेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. परंतु विकासाचे मुद्दे आणि मतदारसंघातील …
Read More »पैशाचे राजकारण मोडून विकासाचे राजकारण करणार
राजू पोवार : यरनाळ, अंमलझरी गव्हाणमध्ये निजदची सभा निपाणी (वार्ता) : दरवेळी विधानसभा, लोकसभा व इतर निवडणुका होतात. त्यामध्ये केवळ पैशाचे राजकारणात केले जाते. अशा निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात असून आता पैशाचे राजकारण करणाऱ्यांना बाजूला करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या वेळी चिरीमिरी देऊन निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून विकास कामाची अपेक्षा …
Read More »क्षत्रिय मराठा परिषद, कुस्तीगीर संघटना आणि जनसेवा फाउंडेशन यांचा मुरलीधर पाटील यांना जाहीर पाठिंबा
खानापूर : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषद व खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना आणि जनसेवा फाउंडेशन खानापूर तालुका यांची संयुक्त बैठक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी तिन्ही संघटनेच्या वतीने मुरलीधर …
Read More »झाशीच्या राणीसारख्या अंजलीताईंना विधानसभेत पाठवा : अशोक चव्हाण
खानापूर : खानापूर तालुक्यात सर्वत्र अंजली पर्वाला सुरुवात झाली आहे. आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी तालुक्यातील गर्लगुंजी गावात शेकडो कार्यकर्त्यांसोबत रोड शो आणि कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी झाशीच्या राणीसारख्या लढवय्या अंजलीताईंना विधानसभेत पाठवा असे आवाहन जन समुदायाला केले. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री …
Read More »विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विजयी करा
राजू पोवार : बेडकीहाळ, गळतगा परिसरात सभा निपाणी (वार्ता) : प्रत्येक गावातील शेतकरी संघटित नसल्याने दहा वर्षापासूनच आपण शेतकऱ्यांचे संघटन करून रयत संघटनेच्या नावाखाली कामकाजाला सुरुवात केली. अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या पिकाला भरपाई मिळवून दिली आहे. तर पडझड झालेल्या घरांनाही मदत मिळावी, यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर संघटनेतर्फे आंदोलन …
Read More »खानापुरातही अशोक चव्हाण यांना दाखवण्यात आले काळे झेंडे!
बेळगाव : बेळगाव सीमाभागात विविध पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांना म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल गुरुवारी टिळक चौक येथे काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बेनकनहळी येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार सतेज पाटील …
Read More »दंडेलशाही रोखण्यासाठी समितीला मत द्या : रणजित पाटील
हलगा येथे मुरलीधर पाटलांची रॅली, सभा खानापूर : गेल्या ६७ वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून अत्याचार होत आहेत. तरीही मराठी भाषिकांनी आपल्या मायमराठीच्या राज्यात जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते मराठी भाषिकांचे खच्चीकरण करत आले आहेत. मात्र, यापुढे त्यांची दंडेलशाही सहन केली जाणार …
Read More »लालवाडी, हेब्बाळ येथे समितीच्या विजयाचा निर्धार!
घरोघरी प्रचार; मुरलीधर पाटलांना मताधिक्य देण्याचे आवाहन खानापूर : हेब्बाळ आणि लालवाडी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी खानापूर मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर पाटील यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी कोपरा सभा घेऊन समितीला मतदान करण्याचे आवाहन केले. दोन्ही गावातील मराठी भाषिकांनी समितीच्या पाठिशी असून मुरलीधर पाटील यांना बहुमताने विजयी करण्याचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta