आमदार रोहित पवार : उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ सभा निपाणी (वार्ता) : भ्रष्टाचारांच्या विरोधात क्रांती घडवायचे असेल तर शेवटपर्यंत लढावे लागेल. त्यामध्ये कंटाळा करता कामा नये. गेल्या दहा वर्षात मंत्री पद भोगूनही अनेक कामे अपूर्ण आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी आता अंडी घोटाळा करणाऱ्या मंत्र्यांना बाजूला करून सर्वसामान्यांच्या अपेक्षा …
Read More »वाणी मठ परिसरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील
उत्तम पाटील : कार्यकर्त्यांशी साधला संवाद निपाणी (वार्ता) : शहराबरोबर उपनगराचेही अजूनही अनेक समस्या तशाच आहेत. त्याच्या सोडवणुकीडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भविष्यात या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी आपण ही निवडणूक लढवीत आहोत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. येथील …
Read More »अरिहंत संस्थेचे ११०० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण
संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील : ९.७२ कोटीचा नफा बोरगाव : सहकार क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देऊन नफा कमविण्याचा उद्दिष्ट बाजूला ठेवून अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्था कार्यरत आहे. संस्थेत ११०० कोटी इतक्या ठेवी असून उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ९३८ कोटी इतके कर्ज वाटप करून आर्थिक वर्षात ९ कोटी ७२ लाख ९३ …
Read More »निजद उमेदवार राजू पोवार यांच्या प्रचाराचा झंझावात
मतदारसंघातील विविध गावांना भेटी; मतदारांचा वाढता प्रतिसाद निपाणी (वार्ता) : विधानसभा मतदारसंघातील निधर्मी जनता दल पक्षाचे अधिकृत उमेदवार व रयत संघटना चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी वेळोवेळी शेतकरी कष्टकरी गोरगरीब यांच्या न्याय हक्कासाठी मोर्चे आंदोलने प्रसंगी आक्रमक भूमिका घेऊन आपली वेगळी छाप निपाणी विधानसभा मतदारसंघांमध्ये केलेली आहे. यासाठी …
Read More »प्रियंका गांधी यांची खानापुरात उद्या जाहीर सभा!
खानापूर : खानापूर विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची जाहीर सभा रविवार दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता श्री मलप्रभा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. अंजलीताई निंबाळकर व …
Read More »कॉंग्रेसने आपली बुध्दी हरविली आहे
अमित शहा, खर्गेनी मोदींवर केलेल्या टीकेचा समाचार बंगळूर : काँग्रेसचे अध्यक्ष एम. मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘विषारी साप’ म्हटल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर तोफा डागल्या. कॉंग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या मनाचा तोल ढासळला असल्याचे ते म्हणाले. धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद येथे जाहीर सभेला ते आज …
Read More »पक्ष सत्तेवर आल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीला एक हजार कोटी
राहूल गांधी; कल्याण कर्नाटकासाठी पाच हजार कोटी बंगळूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी जेवर्गी (कर्नाटक) येथे बोलताना राज्याच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची सत्ता आल्यास प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक कोटी रुपये आणि कल्याण कर्नाटक प्रदेशासाठी पाच हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले. पावसाच्या दरम्यान, माजी काँग्रेस प्रमुखांनी एका निवडणूक …
Read More »विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका
उत्तम पाटील : निपाणीत कोपरा सभा निपाणी (वार्ता) : अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सतत ३० वर्षे समाजसेवेचे व्रत सुरू आहे. सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या आदर्श वाटचालीवरूनच आपण पदाक्रांत करत असताना सर्वसामान्य नागरिकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. काय समाजकार्याला राजकारणाची जोड हवी असल्याने आपण निवडणूक रिंगणात आहोत. अनेक भुलथापा …
Read More »कोगनोळी तपास नाक्यावर 4 लाख 17 हजार जप्त
अधिकाऱ्यांची कारवाई कोगनोळी : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असलेल्या तपास नाक्यावर खाजगी चार चाकी वाहनाची तपासणी केली. यामध्ये 4 लाख 17 हजार रुपये असल्याचे निदर्शनास आले. घटना मंगळवार तारीख 25 रोजी रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष नवले (राहणार मुंबई) हे आपल्या खाजगी चार चाकी …
Read More »शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निवडणूक रिंगणात : राजू पोवार
धजदचा प्रचार प्रारंभ निपाणी (वार्ता) : गेल्या १५ वर्षात निपाणी मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. रयत संघटनेच्या बळावर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या उसासह इतर पिकाला हमीभाव मिळावा यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विधानसभेला सुध्दा घेराव घातला आहे. ऐन दिवाळीच्या काळात आपणासह कार्यकर्त्यांना पोलीस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta