माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या : निपाणीत प्रचार सभा निपाणी (वार्ता) : भाजपा सरकारने दिलेल्या वचना पैकी एकही वचन पूर्ण करता भ्रष्टाचार करण्याचा उच्चांक केला आहे. गेल्या चार वर्षात कोणतेही विकास काम केलेले नाही. महागाई वाढवून सर्वसामान्यांच्या पोटावर पाय आणले आहे. शिवाय कर्नाटक राज्याला भ्रष्टाचाराचा कलंक लावला आहे. त्यामुळे या निवडणुकीत …
Read More »खानापुरात वाळू माफिया पुन्हा सक्रिय
खानापूर : खानापुरात अवैद्य वाळू वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. खानापुरात वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले असून दिवसाढवळ्या वाळू उपसा व वाळू वाहतूक राजरोसपणे केली जाते. पोलिसांना किंवा इतर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना चकवा देण्यासाठी वाळू वाहतूकदार सुसाट वेगाने वाहने चालवितात. एखाद्या वेळेस वाहनावरील नियंत्रण सुटून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता …
Read More »शंकर कुरूमकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस प्रवेश
खानापूर : खानापूर तालुका गंगवाळी येथील शंकर कुरूमकर यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी खानापूर तालुक्याचा आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर या उपस्थित होत्या. यावेळी बोलताना शंकर कुरूमकर म्हणाले की, मागील पाच वर्षात माननीय आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापुरात विकासाची गंगा आणली. काँग्रेस पक्ष हा तळागाळातील जनतेला …
Read More »निपाणी मतदारसंघात भाकरी परतण्याची वेळ
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील : आप्पाचीवाडी येथे प्रचार प्रारंभ निपाणी (वार्ता) : राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठीचा गर्दीचा उच्चांक म्हणजेच उमेदवाराचा विजय आहे. हा पक्ष सर्वसामान्यांना घेऊन जाणारा असून कार्यकर्त्यांना न्याय आणि संधी देणारा आहे. निपाणी मतदारसंघात आता भाकरी परतायची वेळ आली असून मतदारांच्या पाठिंबामुळे उत्तम पाटील हे राष्ट्रवादीचे कर्नाटकातील पहिले …
Read More »जनतेची दिशाभूल करणारे प्रचारात!
खानापूर : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालू आहे. सर्वच उमेदवार आपापल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत आहे. भारतीय जनता पार्टीने देखील राज्यात पुन्हा सत्तेत येण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी महाराष्ट्र व केंद्रातून स्टार प्रचारक प्रचारासाठी येत आहेत. 2014 मध्ये अच्छे दिन, काळे धन, रोजगार यासारखी आमिषे दाखवून केंद्रात सत्तेत आलेलं …
Read More »शिवसेनेचा मुरलीधर पाटील यांना पाठिंबा : सहसंपर्क प्रमुख नागनुरी यांची माहिती
के. पी. पाटलांचा शिवसेनेशी संबंध नाही बेळगाव : के. पी. पाटील यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नसून जिल्हा आणि तालुका शिवसेनेचा म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना पाठिंबा असल्याची घोषणा शिवसेना सीमाभाग संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी व शिवसेना बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी खानापुरात बैठक घेउन केली. …
Read More »कोगनोळी नाक्यावर दीड लाखाची रोकड जप्त
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर कोगनोळी टोलनाक्यावर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास प्रवाशाकडील दीड लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. निरंजन पी. शेट्टी (राहणार मुडबिद्री) असे पैसे जप्त करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत निपाणी ग्रामीण पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, रात्री …
Read More »आम आदमी पक्षामुळे मतदारसंघ भ्रष्टाचार मुक्त; निपाणीत प्रचारफेरी
निपाणी (वार्ता) निपाणी मतदारसंघातून आम आदमी पक्षातर्फे डॉ. राजेश बनवन्ना निवडणूक लढवत असून आपच्या प्रचारास मतदार संघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदारांचा प्रतिसाद पाहता आम आदमी पक्ष निवडणुक जिंकणार असून मतदारसंघ भ्रष्टाचार मुक्त होईल, असा विश्वास अमोल बेडगे यांनी व्यक्त केला. निपाणी शहरातून काढलेल्या प्रचार फेरीप्रसंगी ते बोलत होते उमेदवार …
Read More »प्रा. सुभाष जोशी यांची निष्ठा धन, दांडग्याशी
काकासाहेब पाटील ; आप्पाचीवाडी येथे प्रचाराचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : राजकीय वाटचाल सुरू केल्यापासून आजतागायत आपण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून तळातून काम करत राहिलो आहे. पण अलीकडच्या काळात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होत आहे. या काळात माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी आपल्याला एक वेळ सहकार्य केले होते. …
Read More »जत्राट गावचे युवा नेते रमेश भिवसे यांचा उत्तम आण्णा गटात जाहीर प्रवेश
निपाणी : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उभे असलेले उत्तम रावसाहेब पाटील यांच्या गटात जत्राट गावचे माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व नेते रमेश भिवसे व त्यांचे सहकारी यांनी प्रवेश करून येत्या 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत उत्तम आण्णा यांना भरघोस मताने निवडून आणण्याचा संकल्प केला. यावेळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta