Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होणार

  नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा काही क्षणांत होणार आहे. निवडणूक आयोगाने आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद बोलावली असून निवडणुकीची तारीख जाहीर केली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणूक प्रक्रियेची घोषणा करतील. आजपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होऊ शकते.

Read More »

“या मागचा” बोलविता धनी वेगळाच!

  खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे चार मतदार संघात समितीचा भगवा फडकविण्याचा निर्धार केला जात असतानाच खानापूर तालुक्यात दूही माजविण्याचा प्रयत्न काही जणांनी सुरु केला आहे. मात्र या मागचा बोलविता धनी वेगळाच असल्याचे चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. तसेच समिती विरोधात गद्दारी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांतून दिला …

Read More »

पीकेपीएस सोसायटीकडून रेशन वाटपात भ्रष्टाचार!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीकडून रेशन वाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संचालक मंडळ सदस्य आणि सचिवाला चांगलेच धारेवर धरल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीला ग्रामस्थांना रेशन वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. नंदगड …

Read More »

शिकारीपूरमध्ये येडियुरप्पांच्या घरावर दगडफेक; संचारबंदी

  आरक्षणाविरोधात बंजारा समाजाचे आंदोलन बंगळूर : शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुर येथील भाजप जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या घरावर बंजारा समाजाच्या सदस्यांनी सोमवारी दगडफेक केली. राज्य सरकारच्या अनुसूचित समुदायांसाठी (एससी) अंतर्गत आरक्षणाच्या घोषणेला विरोध झाल्याने शहरात निषेधाज्ञा (कलम १४४) लागू करण्यात आला आहे. या आंदोलनात काही पोलीस …

Read More »

कर्नाटकातील भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा लाचप्रकरणी अटकेत

  बंगळुरु : कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांना सोमवारी (दि. २७ मार्च) तुमाकुरू येथील क्याथासांद्र टोल प्लाझाजवळून अटक करण्यात आली. भाजपचे आमदार मादल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मदाल याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी २ …

Read More »

विरुपक्षालिंग समाधी मठ गोशाळेच्या चाऱ्याला आग लावणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी

  निपाणी : अज्ञात समाजकंटकाकडून श्री विरुपक्षालिंग समाधी मठ गोशाळेच्या चाऱ्याला आग लावण्यात आली. अशा समाजकंटकाला शोधून कडक कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने बसवेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय आनंदराज कॅरीकट्टी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निपाणी तालुक्यामधील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कायदेशीर …

Read More »

जिल्हाधिकारी दानम्मनवर व जिल्हा पोलिस प्रमुख आनंद कुमार यांची अचानक चेकपोस्टला भेट

  विजयपूर : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजयमहंतेश बी. दानम्मनवर आणि जिल्हा पोलिस प्रमुख एच. डी. आनंद कुमार यांनी रात्री उशिरा अचानक भेट देऊन चेकपोस्टच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाची पाहणी केली. जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कानमडी, अलगीनाळा यासह विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या चेकपोस्टला भेट देऊन त्यांनी सांगितले की, निवडणूक आचारसंहिता …

Read More »

जितो इंटरनॅशनल ट्रेड सेंटरचा “सामाजिक कार्यकर्ता” पुरस्कार प्रमोद कोचेरी यांना प्रदान

  खानापूर : खानापूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागातील रस्ते होण्यासाठी, दुर्गम भागातील गरिबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क ठेवून त्यांच्या कानावर या गोष्टी घालून लोकांच्या समस्या मार्गी लावणारे व या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेले खानापुरातील सामाजिक कार्यकर्ते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांना जितो इंटरनॅशनल ट्रेड सेंटरचा “सामाजिक कार्यकर्ता” …

Read More »

हैदराबाद मुक्तीसाठी लढणाऱ्यांचा काँग्रेसला विसर

  अमित शहा यांचा हल्लाबोल, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण बंगळूर : ज्यांनी हैदराबादच्या ‘क्रूर’ निजाम राजवटीपासून मुक्ती मिळविण्यासाठी लढा दिला आणि बलिदान दिले त्यांची काँग्रेसला कधीही आठवण झाली नाही, असा आरोप करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. बिदर जिल्ह्यातील गोरटा गावात गोरटा हुतात्मा …

Read More »

आमदार सुनील गौडा पाटील यांनी हृदयविकाराने त्रस्त तरुणावर केला मोफत उपचार

  विजयपूर : हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एका गरीब बांधकाम कामगाराला शस्त्रक्रियेसाठी मदत करून विधान परिषद सदस्य सुनील गौडा पाटील यांनी माणुसकी दाखविली. विजयपूर शहरातील इंडी रोड येथील हमनमंता गोठे (वय 28) यांना हृदयविकाराचा आजार होता. बांधकाम मजूर असलेल्या या तरुणाने त्याचे वडील, आई आणि पत्नी गमावले असल्यामुळे तो अत्यंत संकटात …

Read More »