खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नारायण मयेकर होते. बैठकीला स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर, चीफ ऑफिसर आर. के. वटार होते. प्रास्ताविक प्रेमानंद नाईक यांनी केले. यावेळी बैठकीत खानापूरशहराच्या एस सी एस टी स्मशानभूमीत विद्युत खांबाची सोय करण्याबाबत चर्चा …
Read More »खानापूरात मुलींची थ्रो बॉल स्पर्धा; गव्हर्मेंट हायस्कूल खानापूरने पटकावला पहिला क्रमांक
खानापूर : खानापूर येथे डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नियती फाउंडेशनच्या वतीने खानापूर येथे कित्तुर राणी चनम्मा ट्रॉफी मुलींच्या थ्रो बॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यासाठी मुलींचा व त्यांच्या पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सामन्यामध्ये 16 मुलींचे संघ सहभागी झाले होते. नियती फाउंडेशनतर्फे विजेत्या संघाला 70001 रुपये, 5000 …
Read More »डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले कोळेकर कुटुंबीयाचे सांत्वन
खानापूर : खानापूर तालुक्यातील कौंदल गावातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर येताच भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. महादेव सुभाष कोळेकर (17) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लष्करात भरती न झाल्याने त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. डॉ. सोनाली सरनोबत यावेळी बोलताना …
Read More »खानापूर विधानसभा मतदारसंघातून मुरलीधर पाटील यांचा समितीकडे अर्ज सादर
खानापूर : विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून इच्छुकांचे अर्ज सादर करण्यासाठी आवाहन केले आहे. यानुसार आज खानापूर विधानसभा मतदारसंघातून खानापूर मध्यवर्ती विकास बँकेचे मुरलीधर पाटील यांनी उमेदवारीसाठी अर्ज समितीकडे सादर केला आहे. अर्जदारांकडून ५१ हजार रुपये देणगीदाखल घेऊन म. ए. समिती अर्ज स्वीकारत …
Read More »खानापूर म. ए. समितीची जांबोटीत जनजागृती फेरी
बहुसंख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवाहन खानापूर : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाचा लढा आता सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असून आपण सर्वांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन आगामी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी व मराठी भाषिकावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीकडे …
Read More »रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास उपोषण; संतप्त नागरिकांचा इशारा
उत्तम पाटील युवाशक्तीतर्फे तात्पुरती डागडुजी निपाणी (वार्ता) : बोरगाव ते इचलकरंजी, कुरुंदवाड, बेडकिहाळ, हुपरी तथा अन्य मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे अडचणीचे ठरले आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा नगरसेकांसह नागरिकांनी दिला आहे. बोरगाव येथे उत्तम पाटील …
Read More »महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी निवेदन
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरामध्ये महापुरूषांचे लहान मोठे पुतळे आणि चौक आहेत. त्या स्थळावर नगरपालिकेच्या वतीने त्यांच्या नावाचे फलक लावण्यासाठी कार्य लिहावे. तेथील परिसर दररोज स्वच्छ व सुंदर ठेवावा. महापुरुषांचा एकेरी भाषेमध्ये होणारा उल्लेख टाळावा. यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी नगरपालिकेने प्रयत्न करावे. अन्यथा श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने …
Read More »क्रांतीज्योती महिला मंडळातर्फे हळदीकुंकू कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील क्रांतीज्योती महिला मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अँड. शितल शिप्पुरकर होत्या. प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी स्रियांनी हक्क व तरतुदी यांची माहिती करून …
Read More »निपाणीचे नगरसेवक शौकत मनेर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय पातळीवर काम करणार्या राजस्थान येथील बडीखाटू जायल येथील संत कबीर आश्रम सेवा संस्थान यांच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन निपाणीतील नगरसेवक शौकत मनेर यांना गौरवण्यात आले. मनेर यांच्या सामाजिक सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार 5 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय …
Read More »जटगे गावच्या नुतन हनुमान मुर्तीचे भव्य मिरवणूकीने स्वागत
खानापूर (प्रतिनिधी) : जटगे (ता. खानापूर) येथील ग्रामस्थांच्यावतीने नव्याने उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिरात हनुमान मुर्तीची प्रतिष्ठान होणार आहे. या निमित्ताने नुतन हनुमान मुर्तीचे स्वागत भव्य मिरवणूक काढून करण्यात आले. प्रारंभी चापगांवातुन हनुमान मुर्तीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. गावातून हनुमान मुर्तीला सुवासिनीनी आरती ओवाळून स्वागत केले. नुतन हनुमान मुर्ती ट्रक्टरमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta