Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

कर्नाटकात भाजपची अवस्था होऊ शकते खराब!

    नवी दिल्ली : 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी राहिला आहे. भाजपसह विरोधी पक्षानेही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. 2019 मध्ये पराभूत झालेल्या लोकसभा मतदार संघात भाजपनं कंबर कसली आहे. केंद्रीय मंत्री त्या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. प्रत्येक बूथ मजबूत करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. …

Read More »

माऊली देवीच्या आशीर्वादाने खानापूर समितीच्या जनजागृती दौऱ्याची सुरूवात!

    खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीची एकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नूतन पदाधिकारी नेमणूक करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 1 फेब्रुवारी रोजी म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात जनजागृती दौऱ्याची सुरूवात कणकुंबी येथील माऊली देवीच्या पुजनाने करण्यात आली. खानापूर तालुका …

Read More »

रमेश जारकीहोळींच्या निवासस्थानासमोर शिवकुमार समर्थकांची निदर्शने

    रमेश जारकीहोळीना हद्दपार करण्याची मागणी बंगळूर : प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर, त्यांच्या समर्थकांनी आज (ता. ३१) माजी मंत्री व आमदार रमेश जारकीहोळी यांच्या बंगळुर येथील निवासस्थानासमोर जोरदार निदर्शने केली. शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी रमेश जारकीहोळी यांच्या हद्दपारीची …

Read More »

कळसा-भांडूरा प्रकल्पाला कायद्यानुसारच मंजुरी

  मुख्यमंत्री बोम्मईंचे गोवा सरकारला प्रत्युत्तर बंगळूर : केंद्र सरकारने कायदेशीर लढाईनंतरच कळसा-भांडूरा प्रकल्पाचा अहवाल (डीपीआर) मंजूर केला, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सांगितले. कळसा-भांडूरा प्रकल्पासाठी म्हादाई नदीचे पाणी वापरण्यावरून कायदेशीर लढाई सुरू करण्याच्या गोवा सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. गोवा सरकारच्या योजना काय आहेत हे …

Read More »

राज्यात भाजपचीच लाट; मुख्यमंत्री बोम्मई

  उमेदवार यादीवर निर्णय नाही बंगळूर : राज्यात भाजपची लाट पसरत असल्याचा दावा करत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी स्पष्ट केले की, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. याबाबत फक्त सर्वेक्षण सुरू आहे. बोम्मई म्हणाले, की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एकदिवसीय दौऱ्यामुळे कर्नाटकात भाजपची लाट निर्माण झाली …

Read More »

नगरसेवकांची बदनामी करण्याचे षडयंत्र : नगरसेवक विलास गाडीवड्डर

कार्यकर्त्यांच्या विचारातूनच पुढील निर्णय निपाणी : आई-वडिल आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठे केले असून आम्ही मोठे केले या भ्रमात कोणत्याही नेत्याने राहू नये. सुरुवातीपासून आपण आक्रमक भूमिका घेतली. मात्र गेले वर्षभर राजकारणाचा भाग म्हणून शत्रूला गाफील ठेवण्यासाठी विरोधी नगरसेवक शांत राहिले. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे त्यामुळे याचा निपाणीकरांना लाभ …

Read More »

दुसऱ्यांच्या घरासमोर जीपीएस करून घरकुल रक्कम हडप

वाळकीतील घटना : तालुका पंचायत अधिकाऱ्याकडून चौकशी निपाणी (वार्ता) : दुसऱ्यांच्या घरासमोर फोटो काढून जीपीएस करून घरकुलाची रक्कम हडप केल्याची घटना २०१०-११ साली वाळकी ग्रामपंचायतमध्ये घडली आहे. याबाबत ग्रामस्थांनी सलग पाच वर्षे शासकीय अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तालुका पंचायतराज विभागाचे …

Read More »

खानापूर समितीत पाच उपाध्यक्षांची निवड; उद्यापासून विभागवार जनजागृती

  खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक 30 जानेवारी रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी प्रास्ताविक केले व बैठकीचा हेतू स्पष्ट केला तर सचिव सीताराम बेडरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात …

Read More »

असोगा येथील श्री रामलिंगेश्वर मंदिर व रवळनाथ मंदिराचा जीर्णोद्धार विधी व उद्घाटन सोहळा शुक्रवारी

  खानापूर (प्रतिनिधी) : असोगा (ता. खानापूर) येथील श्री रामलिंगेश्वर मंदिर व श्री रवळनाथ मंदिराचा जीर्णोद्धार विधी व उद्घाटन सोहळा शुक्रवारी दि. ३ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग देव ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत पाटील राहणार असुन श्री रामलिंगेश्वर मंदिराचे उद्घाटन भाजप नेते व श्री महालक्ष्मी …

Read More »

महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक : डॉ. सोनाली सरनोबत

  खानापूर : स्त्री शक्ती बचत गटांकडून हलसाल गावात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि खानापूर भाजप प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांनी शिक्षणाकडेही अधिक लक्ष केंद्रित करावे. …

Read More »