Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

राज्य पत्रकार संमेलन यशस्वीसाठी सहकार्य करावे : शिवानंद तगडूर

  विजयपूर : ऐतिहासिक विजयपूर शहरात पहिल्यांदाच 37 वे कर्नाटक राज्य पत्रकार संमेलन आयोजित करण्यात आले असून संमेलन यशस्वीसाठी सर्व पत्रकार, माध्यम प्रतिनिधींनी व नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष शिवानंद तगडूर यांनी केले. जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना …

Read More »

वन हक्क संघर्ष समितीची लढाई न्याय मिळेपर्यंत लढत राहणार : काॅ. संपत देसाई

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अनेक धनगरवाडे, गवळीवाडे, त्याचबरोबर तालुक्याच्या जंगल भागातील शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून जंगलात राहुन शेती करून उदरनिर्वाह करतात. मात्र वन खात्याकडून सतत जंगलातील जमिनींबाबत विरोध करत शेतकरी वर्गाला जगणे मुश्कील केले. या वनखात्याच्या विरोधात सतत लढा दिला जात आहे. वन हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा …

Read More »

कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी लवकरच

  विद्यमान आमदारांना उमेदवारी निश्चित, निवडणूक समितीची दोन फेब्रुवारीला बैठक बंगळूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या १०० हून अधिक मतदारसंघांसाठी उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यादी अंतिम करण्यासाठी काँग्रेसच्या राज्य निवडणूक समितीची दोन फेब्रुवारीला बैठक होणार असून उमेदवारांची पहिली यादी १० फेब्रुवारीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व …

Read More »

निपाणीत ‘अरिहंत’ चषक व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ

राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मैदानावर रविवार (ता.२२ ते बुधवार (ता.२४ ) अखेर अरिहंत उद्योग समूह, उत्तम पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने बालवीर स्पोर्ट्स क्लब यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवर महिला आणि पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे …

Read More »

घार्लीतील अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबाना विठ्ठलराव हलगेकर यांची आर्थिक मदत

  खानापूर (प्रतिनिधी) : घार्लीतील (ता. खानापूर) तीन महिलांचा धारवाड रामनगर महामार्गावर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच तोपिनकट्टी श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, लैला शुगर्सचे एम डी सदानंद पाटील, संचालक चांगापा निलजकर आदींनी घार्ली येथील मृतांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचे सांत्वन केले. या अपघातात निधन पावलेल्या …

Read More »

जाॅर्डन गोन्सालवीस यांचा लायन्स क्लबच्यावतीने सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लबच्यावतीने शनिवारी दि. २१ रोजी खानापूर वनविभागाच्या विश्रामधामात सामाजिक कार्यकर्ते, कदंबा फाऊंडेशनचे अध्यक्ष, भाजप नेते जाॅर्डन गोन्सालवीस यांचा सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विशेष मार्ग दर्शक म्हणून बेळगाव जिल्हा ३१७ बी चे रिजन चेअरपर्सन एमजेएफ ऍड. गुरूदेव सिध्दापूरमठ उपस्थित होते. तर खानापूर लायन्स …

Read More »

तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर खानापूर तहसीलदार पदी गोठेकर यांची नियुक्ती

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तहसील कार्यालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी बाबतीत चर्चेत असते. सध्या गेल्या दीड महिन्यापासून खानापूर तहसील कार्यालयात तहसीलदार पद रिक्त होते. त्यामुळे नुकताच खानापूर तहसीलदार म्हणून बेळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयातील डीव्हीडीसी अधिकारी व्ही. एम. गोठेकर यांची नियुक्ती करण्यात आली. नुतन तहसीलदार व्ही. एम. गोठेकर यांनी …

Read More »

२६ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात म. मं. महाविद्यालयातील स्वयंसेवकांचा सहभाग

  खानापूर : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने हुबळी येथे आयोजित २६ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात दोन विद्यार्थ्यानी सहभाग दर्शविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पाडलेल्या या कार्यक्रमात युवा पिढीला उद्देशून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात …

Read More »

इंडियन शुगर हाविनाळ (श्री दत्त इंडिया) कंपनीकडून शेतकऱ्यांसाठी वाढीव ऊस दर : उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे

  विजयपूर : विजयपूर जिल्ह्यात चडचाण तालुक्यातील हाविनाळ येथील इंडियन शुगर (श्री दत्त इंडिया) कंपनीचा गळीत हंगाम सन 2022-23 चालू होऊन 74 दिवस झाले असून कारखान्याचे आज अखेर 3 लाख 10 हजार मे.टन इतके गळीत झालेले आहे. कंपनीने गळीत हंगाम सन 2022-23 करिता ऊस दर 2255 रु प्रती मे. टन …

Read More »

निवृत्त सैनिकांना जमिन मिळावी, खासदार मंगला अंगडी यांना निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शेत जमिन नसलेल्या निवृत्त भारतीय सैनिकांना पाच एकर जमीन मिळावी. यासाठी गेली १५ वर्षे अर्ज करून आजतागायत अद्याप जमिन मंजूर करण्यात आली नाही. तेव्हा अर्ज केलेल्या सेवानिवृत्त माजी भारतीय सैनिकाना पाच एकर जमिन मिळावी. अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ भाजपचे नेते आनंदराव पाटील …

Read More »