Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

मणतुर्गा, रुमेवाडी, असोगा येथे खानापूर समितीची जनजागृती

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुका, मराठी आपला बाणा मराठी आपली संस्कृती, मराठी आमचे अस्तित्व मराठी आमची ओळख. ही ओळखच पुसण्याचे काम राष्ट्रीय पक्षांकडून सुरू असताना मेंढरासारखे तुम्ही-आम्ही स्वस्त बसून होणार आहे का? ६० वर्षे समितीचे एकहाती नेतृत्व मान्य करून तालुक्याची धुरा समितीच्या हाती सोपविणारे तुमचे आमचे आई-वडील, आजी-आजोबा …

Read More »

नंदगड ड्यॅमची दुर्दैवी अवस्था

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) गावाच्या पश्चिमेस असलेल्या धरणाची अवस्था फार बिकट झालेली आहे. सदर धरण हे माजी आ. कै. बसपान्ना आरगावी यांनी नंदगड गावाच्या शेतकऱ्याच्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बांधले होते. या नंतर नंदगड धरणाचा आणि म्हणावा तसा गावाचा विकास झालेला नाही. आजपर्यंत कुठल्यापन लोकप्रतिनिधींनी धरणाचा विकासाबद्दल विचार …

Read More »

भिवशीत उत्तम पाटील युवाशक्ती संघटनेचे उद्घाटन

  विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : भिवशी येथे युवा नेते उत्तम पाटील युवाशक्ती संघटनेचे उद्घाटन व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षांनी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते. प्रारंभी भागाचे युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार प्रा. जोशी व मानवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. …

Read More »

ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ नुकसान भरपाई द्या

राजू पोवार : रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : परतीच्या पावसाने चिकोडी तालुक्यांमध्ये थैमान घातलेले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशीसह सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीनला कोंब फुटले तर तंबाखू ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड नैराष्यात आहे. समोर दिवाळी सारखा सण असतांना शेतकरी आसमानी …

Read More »

जबाबदारी ओळखून काम करा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सक्त सूचना

बंगळूर : राज्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या घरे आणि पिकांना मदतीचे वाटप समाधानकारक नाही, असे म्हणत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जिल्हाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. जबाबदारी ओळखून काम करण्याच्या त्यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या. विधानसौध येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या जिल्हाधिकीऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले की, अपेक्षित प्रमाणात उपाययोजना हाती घेण्यात आलेली …

Read More »

करंबळ येथे खानापूर म. ए. समितीची जनजागृती

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी तसेच मराठी भाषिकांची अस्मिता ज्वलंत करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात तुकाराम गाथा व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी काल रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी करंबळ येथे जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. करंबळ येथील …

Read More »

बेळगाव मित्र मंडळ पुणे यांचा वधूवर मेळावा संपन्न

  बेळगाव (प्रतिनिधी) : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात नोकरी, व्यवसाय – उद्योगानिमित्त स्थायिक झालेल्या बेळगावकरांना कौशल्याने एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्री.नारायण महादेव रामजी यांनी गेल्या 32 वर्षांपूर्वी बेळगाव मित्र मंडळ ट्रस्ट,पुणे ची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून श्री. नारायण रामजी पुणे स्थित बेळगावकरांसाठी पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रम …

Read More »

सरकारी भु-अतिक्रमित जमिनी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी लढा कायम देऊ : बाबूराव देसाई

  खानापूर तालुक्यातील अतिक्रमित जमिन धारक शेतकऱ्यांना मार्गदर्शन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जवळपास ५००० एकर जमिनी रेव्हनू पड जमिनी, फाॅरेस्टे खात्याच्या जमिनी, गायरान जमिनी, हंगामी लागवड म्हणजे एच एल जमिनी, अशा जमिनी शेतकरी कसत आहेत. त्या जमिनीचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा. यासाठी तालुका सरकारी भू-अतिक्रमित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकार विरोधात …

Read More »

शिप्पूर -उत्तुर रस्त्यावरील खड्ड्यात आम आदमी पक्षाने केले वृक्षारोपण

  निपाणी (वार्ता) : सतत पडणारा पाऊस आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर खड्डे पडून दररोज अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. टायर फुटणे, पंक्चर होण्यासह वाहनांचेही नुकसान होत आहे. तरी संबंधित विभागाचे रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे परिणामी खड्ड्यांच्या आकारात वाढ झाली आहे. कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा …

Read More »

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत दोशी विद्यालयाचे यश

  यशस्वी खेळाडूंचा सत्कार : विद्यार्थ्यासह शिक्षकांचा आनंदही गगनाला निपाणी (वार्ता) : टुडंट ऑलिम्पिक आसोशिएशनच्या वतीने पुणे(बालेवाडी) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हालीबॉल व खो-खो स्पर्धेत अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यबद्दल खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांची भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ सोमवारी (ता.१७) सकाळी झाला. …

Read More »