सौंदलगा : येथील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (ता.४) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कुर्ली फाटा येथील अन्नपुर्णा हाॅटेल समोर धावत्या दुचाकीचा टायर पंक्चर होऊन झालेल्या अपघात महिला व युवती ठार झाल्या. तर दुचाकीस्वार व बालक गंभीर जखमी झाले. लक्ष्मी आनंद कोप्पद (वय २५, रा. मुगळीहाळ, ता. सौंदत्ती व भाग्यश्री सागर वाकमी …
Read More »मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
कोगनोळी : येथील लाखो जणांचे श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री अंबिका देवीचे दर्शन कर्नाटक राज्य धर्मादाय हाज वक्फ मंत्री शशिकला जोल्ले व चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी घेतले. श्री अंबिका देवीची ओटी भरून गोरगरिबांच्या हितासाठी प्रार्थना केली. यावेळी आमदार फंडातून मंजूर करून दिलेल्या अंबिका भवनच्या कामकाजाची पाहणी केली. कोणत्याही प्रकारची …
Read More »श्री दुर्गामाता दौडने देशाभिमान जागविला : पवन कत्ती
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील श्री दुर्गामाता दौडने युवा वर्गात देशाभिमान जागविण्याचे महत्वपूर्ण कार्य केल्याचे माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती यांनी सांगितले. ते मंगळवारी श्री दुर्गामाता दौडच्या सांगता कार्यक्रमात सहभागी होऊन बोलत होते. पवन कत्तीं, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजय शिरकोळी, संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद …
Read More »गुंजी माउली देवी यात्रोत्सव उद्यापासून; बैल पळविण्याचा कार्यक्रम बंद होणार!
खानापूर (तानाजी गोरल) : गुंजी माउली देवी यात्रोत्सवात परंपरागत पद्धतीने दरवर्षी पालखी प्रदक्षिणेनंतर गुजी पंचक्रोशीतील शेतकरी आपल्या बैलजोड्या शृंगारून मंदिराभोवती पळविण्याची प्रथा आहे. माउली देवी हे पंचक्रोशीतील आराध्य दैवत असून वर्षभर बैलजोडीचे संरक्षण व्हावे, कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा बापा बैलजोडीला होऊ नये म्हणून येथील शेतकरी माउली देवीला नवस बोलतात …
Read More »नग्न पूजा करण्यास भाग पाडून व्हिडिओ केला व्हायरल
वडीलांचे कर्ज फेडण्यासाठी अल्पवयीन मुलावर सक्ती, एफआयआर दाखल बंगळूर : वडिलांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे एका १५ वर्षीय मुलाला ‘बेतालू सेवे’ (नग्न पूजा) हा विधी करण्यास भाग पाडण्यात आले आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. राज्यात ‘बेतालू सेवे’वर बंदी आहे. या वर्षी जूनमध्ये बंगळुरपासून सुमारे ३५० किमी …
Read More »मान रस्त्यासाठी ६ ऑक्टोबरला रास्तारोको
ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मान या गावात गेली ६० ते ७० वर्षे सातत्याने रस्त्यासाठी मागणी करूनही रस्ता करण्यात न आल्यामुळे शेवटी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी गुरुवार दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता जांबोटी येथे रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोवा चोर्ला घाट बेळगाव या मार्गावरील …
Read More »कणगला-तवंदी फाटा येथे टाटा एसला अपघात; चालक ठार
संकेश्वर (महंमद मोमीन) : कणगला-तवंदी फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी ३.३० वाजता टाटा एस स्किड होऊन पलटी होऊन झालेल्या अपघातात टाटा एस चालक तानाजी बसवाणी घोडचे (वय ४५) राहणार निपाणी जागीच ठार झाला आहे. अपघाताची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, अपघाता दरम्यान सदर मार्गावरुन मोलायसीसी वाहतूक करणारा ट्रक …
Read More »संकेश्वरात सर्वत्र श्री दुर्गामाता दौडचे जल्लोषात स्वागत
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात सोमवार दि. ३ ऑक्टोबर रोजी श्री दुर्गामाता दौडचे परीट गल्लीत नगरसेविका सौ. सुचिता परीट, माजी नगरसेवक पिंटू परीट आणि गल्लीतील महिलांनी दौडचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले. अंकले वेस येथे श्रीरामसेना हिंदुस्थान, हनुमान तरुण मंडळाने स्वागत कमानी उभारुन, जल्लोषात स्वागत केले. येथे सुवासिनी महिलांनी छत्रपती …
Read More »मुलांना संस्कारसंपन्न घडविणारी स्वामी विवेकानंद शाळा : स्वप्नाली हुक्केरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : मुलांना संस्कारसंपन्न घडविणेचे कार्य स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेने हाती घेतल्याचे सौ. स्वप्नाली गणेश हुक्केरी यांनी सांगितले. संकेश्वर विश्वचेतन विद्या संस्था संचलित स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या नवरात्र उत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संकेश्वर नेसरी गार्डन डिलक्स येथे आयोजित नवरात्र उत्सव …
Read More »हुक्केरीतून लढतीला तयार : ए. बी. पाटील
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते एस.डी.व्ही.एस. कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रसार माध्यमांनी आपण बेळगांव उत्तर विधानसभा मतक्षेत्रातून निवडणूक लढविणार असल्याचा कांगावा चालविला आहे. पण आपण उतरचा विषय डोक्यात घेतलेला नाही. हुक्केरी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta