Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

आंबोळी शाळेत व्ही. एन. कुंभार यांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : आंबोळी (ता. खानापूर) येथील मराठी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार व शिवाजीनगर मराठी शाळेचे कन्नड शिक्षक बी. व्ही. गडाद यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गावच्या वतीने तसेच एसडीएमसी व शिक्षकाच्या वतीने सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाला शाळा सुधारणा समितीचे चेअरमन अर्जून नाईक, व्हाईस …

Read More »

संकेश्वर सौहार्दची यशस्वी वाटचाल : अमर नलवडे

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सौहार्द क्रेडिट सहकारी संस्था सभासदांचे प्रेम आणि उदंड सहकार्यातून २३ व्या वर्षांत यशस्वी पदार्पण करत असल्याचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक, संस्थेचे अध्यक्ष अमर नलवडे यांनी सांगितले. ते संकेश्वर सौहार्दच्या २३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन …

Read More »

संकेश्वर नागरिक मंचतर्फे छायाचित्रकार राघवेंद्र देवगोजी यांचा सन्मान…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरचे प्रसिद्ध छायाचित्रकार राघवेंद्र देवगोजी यांना हंम्पी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने संकेश्वर नागरिक मंचतर्फे त्यांचा नुकताच शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. जयप्रकाश करजगी म्हणाले, राघवेंद्र देवगोजी यांची फोटोग्राफी निश्चितच कौतुकास्पद राहिली आहे. ते …

Read More »

बिदर-बळ्ळारी महामार्ग चार पदरी करणार

मुख्यमंत्री बोम्मई, कल्याण कर्नाटकचा अमृत महोत्सव उत्साहात बंगळूर : सध्याचा बिदर-बळ्ळारी रस्ता चौपदरी द्रुतगती महामार्ग म्हणून विकसित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. शनिवारी येथे कल्याण कर्नाटकच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते म्हणाले की, प्रस्तावित एक्सप्रेस हायवे कल्याण कर्नाटक प्रदेशातील रस्ते संपर्क सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. रायचूर …

Read More »

बिडी ते पारिश्वाड रस्त्यावरील कोसळलेल्या ब्रिजचा आराखडा खानापूर भाजपाकडून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना सादर

  खानापूर (तानाजी गोरल) : बिडी ते पारिश्वाड रस्त्यावरील कोसळलेल्या ब्रिजचा आराखडा सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील यांना भाजपच्या शिष्टमंडळाने सादर केला. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद कोचेरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पदाधिकारी व नेते मंडळींनी कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री श्री. सी. सी. पाटील यांची बेंगलोर येथे त्यांच्या …

Read More »

भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी आम आदमीचे काम

डॉ. राजेश बनवन्ना : निपाणीत २० रोजी सभेचे आयोजन निपाणी (वार्ता) : दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली तसेच पंजाबमध्ये एकहाती सरकारच्या माध्यमातून पारदर्शक कारभार सुरू आहे. देश भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी आम आदमी पार्टीची गरज आहे. त्यासाठीच देशात या पक्षाचा विस्तार होत आहे. निपाणी भागातही …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

  खानापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त आज खानापूर येथे भाजप तक्रार निवारण केंद्राच्या कार्यकर्त्यांसह डॉ. सोनाली सरनोबत (भाजप महिला मोर्चा ग्रामीण उपाध्यक्ष) यांनी फळ व फुलांच्या रोपांची लागवड केली. मोदीजींनी केलेल्या योजना आणि अनेक विकास प्रकल्पांची माहिती यावेळी सोनाली सरनोबत त्यांनी दिली. भारतमाता व छत्रपती शिवाजी …

Read More »

खानापूर तालुका भाजपने घेतली धर्मादाय हज व वक्फ मंत्री जोल्ले यांची भेट

  खानापूर : भारतीय जनता पार्टी खानापूर यांच्या शिष्टमंडळाने बेंगलोर येथे धर्मादाय हज व वक्फ मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांची भेट घेऊन खानापूर तालुक्यामधील रवळनाथ मंदिर खानापूर, निटुर, लोंढा, पारिशवाड, भांबार्डा, चिक्कदिनकोप, मंग्यानकोप, कोडचवाड, आमटे, बैलूर या 10 गावातील देवस्थानाला समुदाय भवनाची मागणी केली. मंत्र्यांनी या सर्व 10 गावातील समुदाय …

Read More »

हंचिनाळ ते कोगनोळी रस्ता लोकप्रतिनिधी व पीडब्ल्यूडी खात्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित

अनिल कुरणे यांचा आरोप हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ ते कोगनोळी या रस्त्याच्या दयनीय अवस्थेची दखल घेण्याच्या उद्देशाने हंचिनाळ ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत उपोषण शुक्रवार दि. 16 पासून सुरू करण्यात आले होते. सदर उपोषण श्री. तायगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. यावेळी बोलताना अनिल कुरणे म्हणाले की, या भागाचे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक …

Read More »

कणकुंबी चेकपोस्टवर 450 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त

  खानापूर : स्थानिक उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी गोव्यातून कर्नाटकात येणाऱ्या मालवाहू वाहनाला तालुक्यातील कणकुंबीजवळील उत्पादन शुल्क चेकपोस्टवर थांबवून तपासणी केली असता त्यात गोवा राज्यातील 450 लिटर दारू अवैधरित्या गोव्यातून कर्नाटकात आणली जात असल्याचे आढळून आल्याने कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान, बेंगळुरू शहरात नोंदणी केलेल्या लाल रंगाच्या स्वराज मझदा वाहनात गोवा …

Read More »