कोगनोळी : सुळगांव तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेतील शिक्षक डी. ए. मूराळी व एल. वाय. जाधव यांना 2019-20 सालातील तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉक्टर गोरखनाथ चौगुले होते. …
Read More »पारंपारिक वाद्य, लेसर शो मध्ये निपाणीत बापाला निरोप….
तब्बल आठ तास मिरवणूक : महादेव गल्ली मिरवणूक लक्षवेधी निपाणी (वार्ता): ’गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ’ असा जयघोष, डीजे वरील ताल, अत्याधुनिक प्रकाश यंत्रणा आणि ढोल ताशांच्या तालावर आनंदाने नाचत हजारो निपाणीकरांनी लाडक्या बाप्पाला शुक्रवारी (ता.9) भावपूर्ण निरोप दिला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात रात्री उशिरापर्यंत बाप्पांचे विसर्जन झाले. अनुचित …
Read More »शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी लवकरच आंदोलन
राजू पोवार : आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बेळगावात बैठक निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी,पूर परिस्थितीवर इतर कारणामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे. अशातच हेस्कॉमचे खाजगीकरण करण्याचे धोरण अवलंबले जात आहे. त्याला कडाडून विरोध करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लवकरच कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे लवकरच आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष …
Read More »आपचे खानापूर तहसीलदाराना पुन्हा निवेदन
आठ दिवसाच्या आत निवेदनाचा विचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर, नंडगड आणि पारीश्वाड येथिल सरकारी रुग्णालयातील पाच डॉक्टर गेल्या बऱ्याच महिन्यापासून डेप्युटेशनवर आहेत, डॉक्टरांची कमतरता असून देखील नियमबाह्य पद्धतीनं ते गैरहजर आहेत. त्यांना त्वरित सेवेत हजर होण्यासाठी नोटीस द्यावे, अशा मागणीचे निवेदन आपच्या वतीने …
Read More »बी. एम. मोटर्स शोरूमचे बेळगावात उद्घाटन
खानापूर : बेनलिंग औराच्या इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीच्या बी. एम. मोटर्स शोरूमचे उद्घाटन बुधवार (ता.07) रोजी चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक राजेंद्र मुतगेकर यांच्या हस्ते बेळगांव येथील काँग्रेस रोड पराठा कॉर्नरजवळ झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गर्लगुंजीचे सुपुत्र बांधकाम व्यावसायिक व शोरूमचे संचालक बी. एम. चौगुले होते. अभियंता व गोव्यातील नामवंत व्यावसायिक रवींद्र …
Read More »खानापूरच्या माजी आमदारांकडून पुन्हा महिलांविषयी बेताल व्यक्तव्य!
खानापूर : आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षातील महिला पदाधिकारीचा अवमान केला. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वनमंत्री उमेश कत्ती यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दरम्यान, आज खानापूर भाजपच्या वतीने शोकसभा …
Read More »पुढच्या वर्षी लवकर या….
फटाक्यांची आतषबाजी आणि मोरयाच्या जयघोषात बाप्पांचे विसर्जन.. संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनामुळे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दुखवटा पाळून शांततामय वातावरणात श्री गणेश मूर्तीचे विसर्जन केले. विसर्जन मिरवणुकीत नो डाॅल्बी, नो डिजे, ओन्ली फटाक्यांची आताषबाजी आणि गणपती …
Read More »निपाणीत रविवारी रिपब्लिकन परिवार वाद-संवादचे आयोजन
सुनील कांबळे यांची माहिती : प्रा. जोगेंद्र कवाडे, मेघराज काटकर यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : समता सैनिक दलातर्फे निपाणीत रविवारी (ता. 11) सकाळी 10 वाजता डॉ. आंबेडकर भवन येथे रिपब्लिकन परिवार वाद – संवादचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी रिपाईसोचे राष्ट्रीय अध्यक्ष मेघराज काटकर, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय …
Read More »अटल टिंकरिंग लॅबमुळे तंत्र कौशल्ये विकसित : डॉ. संतोष चव्हाण
कुर्ली हायस्कूलमध्ये तंत्रज्ञानचा अविष्कार निपाणी (वार्ता) : निती आयोगाच्या सहकार्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैज्ञानिक उत्तरे शोधण्यासाठी, आधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध झाली आहे, हे अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांची तंत्र कौशल्ये विकसित करण्यासाठी निश्चितपणे अटल टिंकरिंग लॅबचा उपयोग होईल, असे मत शारदा गौराई मॅटर्निटी व नर्सिंग होम निपाणीचे डॉ. …
Read More »राजस्थानी टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करत मुसक्या आवळल्या
कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांची कारवाई कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी पुन्हा एकदा अद्वितीय कामगिरी करताना राजस्थानी गुंडांना कोल्हापुरी पाणी दाखवून दिले आहे. राजस्थानमध्ये बेछुट गोळीबारात खून करून फरार झालेल्या पाच जणांच्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करून काल पकडले. कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. पकडलेल्या पाच जणांच्या टोळीने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta